यंदा भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होतील. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार असून यामध्ये क्रिकेटप्रेमींसाठीही आनंदाची बातमी समोर येत आहे. भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने बीसीसीआयकडे एक खास मागणी केली आहे, ज्यामध्ये भारत विरुद्ध जगातील सर्वोत्तम खेळाडू असा अनोखा सामना खेळवण्याचा उल्लेख केला गेला आहे.
भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून अशी मागणी केली गेल्यामुळे बीसीसीआय देखील याला गांभीर्याने घेईल, असी शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा खास सामना २२ ऑगस्टपासून खेळला जाईल. परंतु बीसीसीआयने याबाबतीत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिली नाहीये. पण बीसीसीआय हा सामना आयोजित करण्यासाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न करत असल्याचेही सांगितेल जात आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले गेले आहे की, “सरकारकडून आम्हाला अस प्रपोजल आले आहे की, या साऱ्यावर विचार सुरू आहे. पण एवढ्या भव्य सामन्यासाठी तयारी करावी लागणार आहे. तसेच भारतीय ११ खेळाडू विरुद्ध जगातील सर्वोत्तम ११ खेळाडू यांच्यातील या सामन्यासाठी जगभरातील जवळपास १३ ते १४ अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू लागतील, अशी शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर त्या सर्वांच्या वेळापत्रकांचाही विचार करावा लागेल. सर्व सोयीसुविधा पुरवाव्या लागतील. या सर्व गोष्टींची तयारी करावी लागेल.”
बीसीसीआयच्या सुत्रांच्या हवाल्याने अशीही माहिती माध्यमांमध्ये समोर आली आहे की, भारतीय संघ हा सामना २२ ऑगस्टला खेळेल. याच कालावधीदरम्यान इंग्लंडमध्ये स्थानिक क्रिकेट सामने, तसेच वेस्ट इंडीजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग खेळवली जाणार आहे. याच कारणास्तव खेळाडू उपलब्ध आहेत की नाही, हे पाहावे लागेल. तसेच हा सामना खेळण्यासाठी जे क्रिकेटपटू भारतात येणार आहेत, त्यांना या सर्वासाठी योग्य ती किंमत दिली जाईल.
दरम्यान, भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्ध १ जुलै ते ५ जुलैदरम्यान खेळला गेलेला सामना भारतीय संघाने ७ विकेट्सने गमावला. परंतु उभय संघातील टी-२० मालिका मात्र भारताने जिंकली. टी-२० मालिकेतील पहिला सामना ६ जुलै रोजी, तर दुसरा सामना ९ जुलै रोजी खेळला गेला. हे दोन्ही सामना भारताने जिंकले आहेत आणि मालिकेतील तिसरा सामना १० जुलै रोजी खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Third T20 | टॉस तर जिंकला, आता सामना जिंकत इंग्लंड राखणार का आपली प्रतिष्ठा?
भुवनेश्वर कुमारच्या स्विंगमागे दडलयं कोणतं रहस्य? खुद्द ‘स्विंग किंग’नेच केला खुलासा
SLvsAUS: आधी गोलंदाज आता फलंदाज ठरतायेत ऑस्ट्रेलियासाठी धोकादायक, ४ श्रीलंकन खेळाडूंनी केली अर्धशतके