भारतीय संघाची कसोटीतील अभेद्य भिंत चेतेश्वर पुजारा सध्या काउंटी क्रिकेटमध्ये व्यस्त आहे. संथ गतीने फलंदाजी आणि विचारपूर्वक शॉट्स मारणाऱ्या पुजाराला तुम्ही गोलंदाजी करताना पाहिले का. कारण त्याने ससेक्स संघाकडून खेळताना फक्त फलंदाजीच नाही तर गोलंदाजीतही आपला हात आजमावला आहे. तो एक फिरकीपटू असून त्याला गोलंदाजी करण्याच्या फारच कमी संधी मिळाल्या आहेत. मात्र गोलंदाजीत तो तेवढा यशस्वी झाला नाही.
भारताचा हा महान खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) इंग्लंड विरुद्धच्या कसोटीनंतर काउंटी चॅम्पियनशीप डिवीजन दोनच्या स्पर्धेत खेळत आहे. त्याने लिसेस्टरशायर विरुद्धच्या सामन्यात एक षटक टाकले आहे. त्याने याआधी भारतीय संघासाठीही एक षटक टाकले होते. त्याने खूप काळानंतर गोलंदाजी केल्याने त्याला थोडे अवघड गेले असावे कारण त्या एका षटकात त्याने ८ धावा खर्च केल्या आहेत. यावेळी त्याला वियान मुल्डरने चौकार देखील मारला आहे.
इंग्लंड विरुद्धच्या एजबस्टन कसोटीसाठी भारतीय संघात पुनरागमन करण्यापूर्वी त्याने ससेक्सकडून काही सामने खेळले होते. त्यादरम्यान त्याने दोन द्विशतक आणि दोन शतक (१७०*, २०३, १०९, २०१*) केले होते. त्याने खेळलेल्या सात सामन्यांमध्ये त्याची सरासरी १४३ एवढी राहिली. याच कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघाच्या कसोटीत स्थान पक्के केले.
An over of @cheteshwar1 bowling. 🚨 pic.twitter.com/I4PdyeCxCx
— Sussex Cricket (@SussexCCC) July 13, 2022
ससेक्सकडून काउंटी क्रिकेट खेळण्याआधी पुजारा रणजी ट्रॉफीमध्येही खेळला होता. या स्पर्धेत त्याने तीन सामने खेळले होते. त्याने सौराष्ट्रकडून खेळताना मुंबई विरुद्ध ९१ धावा केल्या होत्या.
पुजाराने भारताकडून ९६ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्याने ४३.८१च्या सरासरीने ६७९२ धावा केल्या आहेत. त्यात १८ शतके आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. भारताकडून केलेल्या गोलंदाजीत त्याने २ धावा दिल्या होत्या. दिल्लीत २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने गोलंदाजी केली होती.
तसेच पुजाराने २३२ प्रथम श्रेणीचे सामने खेळले असून त्यात १७७४७ धावा केल्या आहेत.यामधील २१ डावांमध्ये त्याने गोलंदाजी करताना ६ विकेट्सही घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘छोटा नाही, ३ वर्षांचा ब्रेक होता’, वनडेतील पुनरागमनाच्या प्रतिक्षेवर मोहम्मद शमी झाला व्यक्त