भारतीय संघ नवीन वर्षाची सुरूवात घरच्या मैदानावर खेळून करणार आहे. भारत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर वनडे मालिका रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळली जाणार आहे. त्यानंतर भारत घरच्याच मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेत तीन सामने खेळले जाणार आहेत.
बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेतून रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. यामुळे अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकांसाठी भारताचा संघ जाहीर झालेला नाही. नवी निवडकर्ते या संघाची घोषणा करणार आहे.
भारत 3 जानेवारीला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध पहिला टी20 सामना खेळणार आहे. दुसरा सामना पुण्याला 5 जानेवारी आणि तिसरा सामना 7 जानेवारीला तिसरा टी20 सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर वनडे मालिका खेळली जाणार असून पहिला सामना 10 जानेवारीला गुवाहाटी, दुसरा वनडे सामना 12 जानेवारीला कोलकाता आणि तिसरा वनडे सामना 15 जानेवारीला तिरूअंनतपुरम येथे खेळले जाणार आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेची सुरूवात वनडे सामन्याने होणार आहेत. पहिला सामना हैद्राबादला 18 जानेवारी, दुसरा सामना 21 जानेवारीला रायपूरमध्ये आणि तिसरा सामना 24 जानेवारीला इंदौरमध्ये खेळला जाणार आहे. त्यानंतर टी20 मालिका खेळली जाणार आहे. त्यातील पहिला सामना 27 जानेवारीला रांची, दुसरा सामना 29 जानेवारीला लखनऊ आणि तिसरा सामना 1 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. यामुळे भारत 30 दिवसांत तब्बल 12 सामने खेळणार आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी व मुकेश कुमार.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
(India have 12 matches to play in 30 days, Hardik Pandya captain in the first match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताने 2022मध्ये जिंकले सर्वाधिक सामने, तरीही झाली निराशा; पाकिस्तान खूपच मागे
पंतची मदत करणाऱ्यांचा विशेष सन्मान, लक्ष्मणनेही ट्वीट करत मानले आभार