---Advertisement---

कोहलीच्या टीम इंडियाचा भीमपराक्रम; कोणालाही न जमलेली गोष्ट करुन दाखवली!

On: शनिवार, डिसेंबर 7, 2019 2:02 PM
---Advertisement---

हैद्राबाद। शुक्रवारपासून (6 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात(India vs West Indies) 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 208 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना 6 विकेट्सने विजय मिळवला.

या विजयाबरोबर भारतीय संघाच्या नावावर एक मोठा विश्वविक्रम झाला आहे. भारताने त्यांचा टी20मधील सर्वाेच्च धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. त्याचबरोबर 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा पाठलाग करतानाचा भारताचा हा टी20मधील तिसरा विजय आहे.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20मध्ये तीनवेळा 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग(successfully chase down three 200+ targets in T20Is) करणारा भारत पहिलाच संघ ठरला आहे.

याआधी भारताने 2009 मध्ये मोहालीत झालेल्या टी20सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या 207 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यानंतर भारताने 2013मध्ये राजकोट येथे झालेल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 202 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 207 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) 56 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तर कायरन पोलार्डने(Kieron Pollard) 40 धावांची खेळी केली होती.

त्यानंतर 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार विराट कोहलीने(Virat Kohli) 50 चेंडूत नाबाद 94 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर केेएल राहुलने(KL Rahul) सलामीला फलंदाजी करताना 40 चेंडूत 62 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये भारतीय संघाने केलेल्या सर्वोच्च धावांचा पाठलाग –

208 धावा – विरुद्ध वेस्ट इंडिज, हैद्राबाद, 2019

207 धावा – विरुद्ध श्रीलंका, मोहाली, 2009

202 धावा – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, राजकोट, 2013

199 धावा – विरुद्ध इंग्लंड, ब्रिस्टोल, 2018

198 धावा – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, 2016

https://twitter.com/Maha_Sports/status/1203230365571153921

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---