विश्वचषक 2023 स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये असलेल्या संघांमधील अव्वल दोन नावे म्हणजे भारत आणि दक्षिण आफ्रिका होय. विश्वचषकाच्या 37व्या सामन्यात उभय संघ आमने-सामने आहेत. हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने जिंकला असून त्याने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिका संघ आतापर्यंत प्रथम फलंदाजी करताना बरेच सामने जिंकला आहे, अशात रोहितने हा निर्णय घेतल्यामुळे कदाचित त्यांना धक्का बसला असावा.
या सामन्यात भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाहीये. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका संघात एक बदल आहे. या गेराल्ड कोएट्जी संघाबाहेर झाला असून त्याच्या जागी तबरेज शम्सीची एन्ट्री झाली आहे.
🚨 Toss and Team Update 🚨#TeamIndia win the toss and elect to bat first in Kolkata 👌
Follow the match ▶️ https://t.co/iastFYWeDi#CWC23 | #MenInBlue | #INDvSA pic.twitter.com/gvh49Yl6gi
— BCCI (@BCCI) November 5, 2023
स्पर्धेतील कामगिरी
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाच्या विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घ्यायचा झाला, तर भारत आघाडीवर आहे. यामागील कारण असे की, भारताने आतापर्यंत खेळलेल्या सातच्या सात सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे भारत 14 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी आहे. अशात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का देऊन सलग आठवा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका संघाने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यात त्यांना फक्त 1 सामन्यावर पाणी सोडावे लागले आहे. मात्र, उर्वरित 6 सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. त्यांना स्पर्धेच्या आपल्या तिसऱ्या सामन्यात नेदरलँड्स संघाने 38 धावांनी पराभूत केले होते. अशात हा संघ भारताविरुद्ध धमाकेदार प्रदर्शन करून सातवा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. (India have won the toss and have opted to bat against south africa)
विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 37व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
दक्षिण आफ्रिका
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी
हेही वाचा-
इंग्लंडच्या पराभवानंतर जोस बटलरची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘एक कर्णधार म्हणून मी… ‘
विजयानंतर गगनात मावेना कमिन्सचा आनंद, पण व्यक्त केली ‘या’ गोष्टीची चिंता, म्हणाला, ‘आताही वाटतंय की…’