Gautam Gambhir Statement: या महिन्यात भारत विरूद्ध इंग्लंड संघातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. (India vs England Test Series) मालिकेतील पहिला सामना (20 जून) रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेत 5 कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी मालिकेपूर्वी पत्रकारांशी बोलताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गंभीर यांनी रेड बॉल क्रिकेटच्या यशाच्या मंत्रावर आपले मत मांडले आहे. गंभीरने थेट कबूल केले आहे की कसोटी सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 20 विकेट्स घ्याव्या लागतात. म्हणजेच रेड बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाज सर्वात महत्वाचे असतात. प्रशिक्षक गंभीर यांनी मान्य केले आहे की इंग्लंडविरुद्धची ही मालिका खूप कठीण जाणार आहे. (Gautam Gambhir talking about India’s new Test team)
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पत्रकार परिषदेत याबद्दल बोलले आणि म्हणाले, “पाचही ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थिती आहेत, परंतु वरच्या परिस्थिती सर्वात महत्वाच्या असतील. सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर, सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडली जाईल. तो वेगवान अष्टपैलू असो किंवा फिरकी अष्टपैलू असो.”
प्रशिक्षक गंभीर पुढे म्हणाले, “1,000 धावा करूनही तुम्ही कसोटी सामना जिंकू शकत नाही कारण सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 20 विकेट्सची आवश्यकता आहे.” याचा अर्थ असा की गौतम गंभीर भारतीय गोलंदाजांवर अधिकाधिक अवलंबून राहील. म्हणजेच, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप आणि अर्शदीप सिंग हे कसोटी मालिकेत भारतासाठी महत्त्वाचे ठरू शकतात.
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल सांगायचे झाल्यास, भारत आणि इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 136 कसोटी सामने खेळले गेले आहेत (India vs England Head to Head Records In Test), ज्यामध्ये भारताने 35 सामन्यात इंग्लंडला धूळ चारली आहे. तर इंग्लंड संघाने 51 सामन्यात दमदार कामगिरी करत भारताचा धुव्वा उडवला आहे. दरम्यान 50 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. दोन्ही संघांमध्ये शेवटची कसोटी मालिका खेळली गेली होती तेव्हा भारताने इंग्लंडला 4-1 ने हरवले होते.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ-
शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकीपर, उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक-
पहिली कसोटी 20 जून ते 24 जून हेडिंग्ले लीड्स
दुसरी कसोटी 2 जुलै ते 6 जुलै एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी 10 जुलै ते 14 जुलै लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी 23 जुलै ते 27 जुलै ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी 31 जुलै ते 4 ऑगस्ट द ओव्हर, लंडन






