---Advertisement---

साउथ एशियन गेम्स: ३१२ पदकांसह भारताने रचला मोठा इतिहास!

On: बुधवार, डिसेंबर 11, 2019 12:43 PM
---Advertisement---

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा 1 ते 10 डिसेंबर दरम्यान पार पडली. ही स्पर्धा काठमांडू, नेपाळ येथे पार पडली. या स्पर्धेत भारताने उत्कृष्ट कामगिरी करत नवा विक्रम केला आहे.

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या (South Asian Games 2019) इतिहासात भारताने सर्वोच्च पदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 310 पदके जिंकली आहेत. यामध्ये 174 सुवर्ण, 93 रौप्य आणि 45 कांस्यपदकांचा समावेश आहे.

यापूर्वी भारताने 2016 मधील दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 309 पदकांची नोंद केली होती. यावेळी 312 पदके जिंकून भारताने स्वत: चा विक्रम (Record) मोडला आहे.

या 13 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत भारतापाठोपाठ यजमान नेपाळने (Nepal) एकूण 204 पदकांसह दुसर्‍या स्थान मिळवले आहे. तसेच, श्रीलंका (Sri Lanka) 251 पदकांसह आणि पाकिस्तान (Pakistan) 131 पदकांसह अनुक्रमे तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

या भारतीय अ‍ॅथलीट्सने सोमवारपर्यंत 279 पदकांची कमाई केली होती. परंतु नंतर अ‍ॅथलीट्सने 31पदकांची भर घालत पदकांची संख्या 312 पदकांपर्यंत पोहोचवली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---