गेल्या काही दिवसांपासून मर्यांदीत षटकांच्या सामन्यात सर्वोत्तम फॉर्ममध्ये असणाऱ्या इंग्लंडचा रथ भारतीय संघाने मंगळवारी (3 जुलै) झालेल्या टी-20 सामन्यात रोखला.
तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात जादू चालली ती फक्त केएल राहुल आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादवची.
केएल राहुलने 101 धावांची शतकी खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर कुलदीप यादवने इंग्लंडच्या फलंदाजीला पाच बळी मिळवत सुरुंग लावला.
पहिल्या टी-20 सामन्यात कुलदीपच्या फिरकीसमोर इंग्लंडची फलंदाजी पूर्णपणे कोलमडून पडली होती.
त्यामुळेच शुक्रवारी (6 जुलै) होणाऱ्या कार्डीफ येथिल दुसऱ्या टी-20 सामन्यात कुलदीप यादवला सामोरे जाण्यासाठी इंग्लंडने चांगलीच कंबर कसली आहे.
गोलंदाजीच्या मशिनने केला सराव-
इंग्लंडने कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलच्या फिरकीचा सामना करण्यासाठी स्पिन बॉलिंग मशीनवर सराव केला आहे.
याविषयी इंग्लंडचा जलदगती गोलंदाज ख्रिस जॉर्डनने पत्रकारांना माहीती दिली.
“आमच्याकडे डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज नसल्याने आम्ही मर्लिन स्पिन मशीनवर डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजाची गोलंदाजी मशिन द्वारे खळण्याचा प्रयत्न करतोय. या मशिनमधून फेकल्या जाणाऱ्या चेंडूला मुबलक प्रमाणात स्पिन मिळतोय.” स्पिन बॉलिंग मशीनबद्द्ल बोलताना ख्रिस जॉर्डन म्हणाला.
यापूर्वी इंंग्लंडने 2005 सालच्या अॅशेज स्पर्धेवेळी ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वार्नचा सामना करण्यासाठी स्पिन बॉलिंग मशीनवर इंग्लिश फलंदाजांनी सराव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी२० सामन्याबद्दल…
ही गोष्ट केली तरच भारत इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकतो – राहुल द्रविड