जर टीम इंडिया वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसनची गोलंदाजी चांगली खेळू शकली तर नक्कीच कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करेल असे मत व्यक्त केले आहे आॅस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राॅने.
“या मालिकेत जेम्स अॅंडरसन मोठा खेळाडू म्हणुन समोर येऊ शकतो. भारतीय संघ त्याचा सामना कसा करतो यावर बरचं काही अवलंबून आहे. भारतीय संघ जेम्स अॅंडरसनला कसा खेळतोय यावरच मालिकेचे भविष्य अवलंबून असणार आहे.” असे मत ग्लेन मॅकग्राॅने व्यक्त केले आहे.
“भारतीय संघाची फलंदाजी ताकद आहे. काही गोलंदाज जखमी झाल्याचे ऐकले आहे. यामुळे भारतीय गोलंदाज या मालिकेत कशी कामगिरी करतात हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे. “असेही हा दिग्गज पुढे म्हणाला.
ग्लेन मॅकग्राॅची कारकिर्द-
४८ वर्षीय मॅकग्राॅ आॅस्ट्रेलियाकडून १२४ कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने २१.६४च्या सरासरीने ५६३ विकेट्स घेतल्या आहेत. केवळ ३० कसोटी सामन्यात मॅकग्राॅने इंग्लंडविरुद्ध २०.९२च्या सरासरीने १५७ विकेट्स घेतल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-त्या गोलंदाजाचा इंग्लंडच्या कसोटी संघात समावेश करणे ‘हास्यास्पद’
-टीम इंडियासाठी खुशखबर! दोन महत्त्वाचे गोलंदाज सराव सामन्यात चमकले