---Advertisement---

भारताचा विजय आणि षटकार! टी२० मालिकेत जुळून आलाय हा विलक्षण योगायोग!!

On: गुरूवार, जानेवारी 30, 2020 1:54 PM
---Advertisement---

हॅमिल्टन। काल(29 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा टी20 सामना सेडन पार्क येथे पार पडला. भारताने या सामन्यात सुुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

या सामन्यातील सुपर ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावांची गरज होती. यावेळी या दोन्ही चेंडूवर भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला. यामुळे या टी20 मालिकेत खास योगायोग झाला आहे.

या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यातही भारताने षटकार मारत विजय मिळवला होता. पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडने दिलेल्या 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 19 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने षटकार मारत भारताचा विजय निश्चित केला होता.

त्यानंतर दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघ 133 धावांचा पाठलाग करत असताना शिवम दुबेने 18 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे या तिन्ही सामन्यात भारताचा विजय षटकाराने साकार झाला आहे.

आता या मालिकेतील चौथा टी20 सामना वेलिंग्टन येथे उद्या (31 जानेवारी) होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---