सध्या भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे अनेक जण त्यांच्यावर टीका करत आहेत. अनेकांनी खेळाडू तसेच संघ व्यवस्थापनाला धारेवर धरले आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनीही आता भारतीय संघावर टीकास्त्र सोडले आहे.
बांगलादेश विरुद्ध भारतीय संघाला विजतेपदाचा दावेदार मानले जात होते. मात्र, पहिल्या सामन्यात भारतीय संघ केवळ 186 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली व बांगलादेशचे 9 गडी 136 धावांवर माघारी धाडले. परंतु, अखेरच्या जोडीने बांगलादेशला विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यातही धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला विजयापासून वंचित रहावे लागले. भारताला 5 धावांनी पत्करावा लागलेला.
भारतीय संघाच्या याच खराब कामगिरीनंतर बोलताना व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विट करत लिहिले,
‘क्रिकेटच्या अनेक गोष्टींमध्ये भारतीय संघ जगात सर्वात पुढे आहे. मात्र, जेव्हा वनडे क्रिकेटची गोष्ट येते तेव्हा आपण अजूनही 10 वर्ष मागे आहोत असे वाटते. इंग्लंडने 2015 विश्वचषकातील पराभवानंतर आपल्या खेळण्याची पद्धत बदलली. त्यांना त्याचे बक्षिसही मिळाले. त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले होते.’
प्रसाद यांनी पुढे लिहिले,
‘आपल्यालाही इंग्लंडप्रमाणे काही असेच निर्णय घ्यावे लागतील. आयपीएलची सुरुवात झाल्यापासून आपण एकही टी20 विश्वचषक जिंकला नाही. आपण वनडे क्रिकेटमध्ये फक्त द्विपक्षीय मालिका जिंकतो. मोठ्या स्पर्धेमध्ये आपली कामगिरी खराब आहे. आपण चुकांमधून शिकत नाही. त्यामुळेच आपला संघ तितका आकर्षक वाटेना.’
भारतीय संघाला पुढील वर्षी मायदेशात होणाऱ्या वनडे विश्वचषकात विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे. त्याच दृष्टीने सध्या संघाची बांधणी देखील केली जातेय.
(India Is 10 Years Behind In ODI Cricket Venkatesh Prasad Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडला पाकिस्तानचा ‘हा’ गोलंदाज स्वप्नातही आठवेल! पदार्पणाच्या सामन्यातच अर्धा संघ धाडला तंबूत
“आता बुमराह-शमीच्या पुढे पाहायची वेळ आलीये”