भारताने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धचा पहिला टी-20 सामना 8 विकेट्सच्या अंतराने जिंकला. यजमान भारतासाठी या सामन्यात अर्शदीप सिंग आणि दीपक चाहर यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. या दोघांच्या भेदक गोलंदाजीपुढे आफ्रिकी संघाची वरची फळी पूर्णपणे उध्वस्त झाली आणि परिणामी त्यांना सामना गमवावा लागला. याच पार्श्वभूमीवर अर्शदीपचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल याने अर्शदीपची तुलना थेट भारताचा माजी दिग्गज झहीर खान याच्याशी केली आहे.
पहिल्या टी-20 सामन्यात आफ्रिकी संघाने अवघ्या 9 धावांवर पाच विकेट्स गमावल्या. अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने डावातील दुसऱ्या षटकात तीन विकेट्स घेत कमाल करून दाखवली. यासाठी त्याला सामनावीर देखील निवडले गेले. त्याने या सामन्यात टाकलेल्या चार षटकांमद्ये 32 धावा खर्च केल्या आणि तीन विकेट्सही घेतल्या. त्याचे हे प्रदर्शन पाहून पाकिस्तानचा माजी दिग्गज यष्टीरक्षक कामरान अकमल (Kamran Akmal) देखील भारावून गेला. झहीर खान (Zaheer Khan) भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. आता अकमलने नवख्या अर्शदीपची तुला थेट झहीरशीच केली आहे.
अकमल स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. तो म्हणाला, “अर्शदीप एक अविश्वसनीय गोलंदाज आहे. माझ्या मते भारतीय संघाला दुसरा झहीर खान मिळाला आहे. गती आणि स्विंग दोन्ही आहे आणि तो विचार करून गोलंदाजी करतो. तसेच मानसिक दृष्टीने देखील तो मजबूत आहे. त्याच्याकडे काय क्षमता आहे हे, आम्हाला माहिती आहे. परिस्तितीचा कसा वापर करून घ्यायचा, हे देखील त्याला माहिती आहे. त्याच्याकडे गोलंदाजीसाठी लागणारे गुणवत्ता आहे. त्याला स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता चांगल्या प्रकारे माहिती आहे.”
“त्याने रिले रुसोला यष्टीपाठी झेलबाद केले. डिकॉकल त्रिफळाचीत केले. सर्वात खास प्रदर्शन डेविड मिलरच्या विरुद्ध केले. जेव्हा त्याने इनस्विंग चेंडू टाकून त्रिफळा उडवला. हे अविश्वसनीय होते. युवा वेगवान गोलंदाजाने खूप जबरदस्तीने आणि परिपक्वतेसह गोलंदाजी केली. त्याच्याकडे पेस आहे. तो युवा देखील आहे. भारतीय संघासाठी हे खूप चांगले संकेत आहेत. भारतीय संघाला लेफ्ट आर्म पेसरची गरजही होती, कारण झहीरनंतर कोणीताच असा गोलंदाज येत नव्हता,” असे अकमल पुढे बोलताना म्हणाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2022: जेमीमाह रोड्रिगेझची ‘फिफ्टी’, भारताचे श्रीलंकेसमोर 151 धावांचे लक्ष्य
स्टेडियमबाहेर जमलेल्या गर्दीला पंतने केले खुश! दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल