---Advertisement---

‘सूर्यकुमारच्या ‘या’ चुकीमुळे भारत हरला’, तिसर्‍या टी20 सामन्यातील पराभवानंतर भारतीय दिग्गजाचं वक्तव्य

On: बुधवार, नोव्हेंबर 29, 2023 2:53 PM
Suryakumar Yadav
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवावर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या पराभवासाठी त्याने कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या खराब कर्णधारपदाला जबाबदार धरले आहे. आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार, सूर्यकुमार यादवने अक्षर पटेल याला 19व्या षटकापर्यंत ठेवले, हा योग्य निर्णय नव्हता. याशिवाय त्याने सहाव्या गोलंदाजाचा अजिबात वापर केला नाही.

गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा 5 विकेट्स राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 3 बाद 222 अशी मोठी धावसंख्या उभारली. भारतीय संघाकडून ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) याने 123 धावांची तुफानी खेळी खेळली. मात्र, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हे लक्ष्य गाठले.ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) याने शतकी खेळी केली. त्याने 48 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकारांसह 104 धावा केल्या.

अखेरच्या तीन षटकात ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी 49 धावांची गरज होती आणि भारतीय गोलंदाजांना या धावसंख्येचाही बचाव करता आला नाही. प्रसिध कृष्णाने 18वे आणि 20वे षटक टाकले, तर अक्षर पटेलने 19वे षटक टाकले. याबाबत आकाश चोप्रा (Aakash Chopra) म्हणाला, “अक्षर पटेल (Akshar Patel) याने 19वे षटक टाकले आणि प्रसिद्ध कृष्णाने 18वे आणि 20वे षटक टाकले. असे असतानाही भारताने सहा गोलंदाजांचा वापर केला नाही. प्रसिध कृष्णाला 68 धावा ठोकल्या पण आपण सहाव्या गोलंदाजाचा वापर न केल्यामुळे त्याला गोलंदाजी करावी लागली. अक्षर पटेल शानदार गोलंदाजी करत होता पण 19व्या षटकात त्याला रोखण्यात आलं. हे का केले गेले हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे.” (India lost because of this mistake by Suryakumar says Indian legend after defeat in third T20 match)

महत्वाच्या बातम्या

आमिरच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाबाबत मोहम्मद हाफीजचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘मी स्वत: त्याला…’
‘माझं नाव व्हीव्हीएस लक्ष्मण आहे’, पहा असं का म्हणाला इशान किशन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---