चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत शनिवारी (30 सप्टेंबर) भारतीय संघासाठी दुसरे सुवर्णपदक पुरूष स्क्वॉश संघाने मिळवून दिले. भारतीय संघाने पाकिस्तानचा अटीतटीच्या अंतिम सामन्यात 2-1 असा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले. अखेरच्या क्षणी अभय सिंग भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
The Moment India beat Pakistan to win the Gold in Men's Team Squash. ????????
– 10th Gold in Asian Games….!!!!pic.twitter.com/Whe6tmYBRF
— Johns. (@CricCrazyJohns) September 30, 2023
निर्णायक सामन्यातील शेवटच्या गेममध्ये अभय याने 2 मॅच पॉईंट वाचवले. त्यानंतर स्वत:ला मिळालेल्या पहिल्याच मॅच पॉईंटला सामना संपवून टाकला. गटसाखळीतील पराभवाचा पुरेपूर वचपा काढत भारताने कमाल केली. सौरव घोषाल, महेश माणगावकर आणि अभय सिंग यांचा भारतीय संघात समावेश होता.
(India Mens Bags Gold In Sqaush In Asian Games)
हेही वाचा-
रोहितच्या विस्फोटक फलंदाजीची ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या मनात दहशत, म्हणाला, ‘तो तुमच्याविरुद्ध 20-24…’
विश्वचषकाच्या 5 दिवसांआधी युवराजची मोठी भविष्यवाणी! ‘हे’ संघ खेळणार सेमीफायनल, एक नाव हैराण करणारे






