सोमवारी (4 सप्टेंबर) नेपाळ संघ पहिल्यांदा भारताविरुद्ध वनडे सामना खेळला. इतिहासात पहिल्यांदा आशिया चषक खेळण्याची संधी मिळालेल्या नेपाळ संघाची फलंदाजी समाधानकारक राहिली. सोमवारी कँडीमध्ये झालेल्या या सामन्यात नेपाळचे फलंदाज भारतीय गोलंदाजांना आव्हान देताना दिसले. प्रथम फलंदाजी करताना नेपाळने 48.2 षटकात 230 धावा केल्या.
भारतीय संघासाठी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. पण या दोन्ही फलंदाजांनी धावा देखील चांगल्याच खर्च केल्या. सिराजने 9.2 षटकात 61, तर जडेजाने 10 षटकात 40 धावा खर्च केल्या. बांगलादेशसाठी सलामीवीर असिफ शेख (Aasif Shaikh) याने 97 चेंडूत 58 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. दुसरा सलामीवीर कुशल भुर्टेल (Kushal Bhurtel) याने अवघ्या 25 चेंडूत 38 धावा कुटल्या. त्याचसोबत आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सोमपाल कामी यानेही 56 चेंडूत 48 धावांची खेळी केली.
भारत विरुद्ध नेपाळ सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
नेपाळ – असिफ शेख, कुशल भुर्टेल,रोहित पौडेल (कर्णधार), भीम, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण छेत्री, ललित राजबंशी.
महत्वाच्या बातम्या –
बीसीसीआय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पाकिस्तानमध्ये दाखल, खास सामन्यासाठी लावणार स्टेडियममध्ये उपस्थिती
दिग्गज रॉस टेलरचा मोठा विक्रम विराटकडून मोडीत! मिळवला खास यादीत चौथा क्रमांक