सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाच्या दुसर्या वनडे सामन्यात 390 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ पूर्णपणे अपयशी ठरला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली. यावर भारतीय संघाचा माजी सलामी फलंदाज आकाश चोप्राने मोठे वक्तव्य केले आहे.
त्याने म्हटले की, जर आपल्याला 350 पेक्षा जास्त धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा असेल, तर भारतीय संघाला रोहित शर्माची नितांत गरज आहे.
350 पेक्षा जास्त धावा करण्यासाठी रोहित आवश्यक
“जर भारतीय संघात रोहित शर्मा असता, तर तुम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक आणि बिनधास्त खेळू शकला असता. परंतु तो संघाचा भाग नाही. जर तुम्हाला 350 धावांपेक्षा अधिक धावांचा पाठलाग करायचा असेल, तर तुम्हाला रोहित शर्माची आवश्यकता आहे,” असे रोहितबद्दल बोलताना चोप्रा म्हणाला.
वरच्या फलंदाजी फळीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा: आकाश चोप्रा
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी केवळ वरच्या फळीतील फलंदाजाच्या चांगल्या कामगिरीमुळे शक्य आहे. खालच्या क्रमांकाच्या फलंदाजांकडून येवढ्या मोठ्या आव्हानाची अपेक्षा करू शकत नाही. सुरुवातीचे तीन फलंदाज लवकर बाद झाल्यावर तुम्ही अशा प्रकाराचे लक्ष्य पूर्ण करण्याची कल्पना ही नाही करू शकत.”
पहिल्या तिघांपैकी एकाचे शतक आवश्यक
“पहिल्या तीनपैकी कमीत कमी दोन फलंदाजांना चांगली कामगिरी करावीच लागेल. चांगली कामगिरीचा अर्थ आहे की, एक तरी शतक केले पाहिजे. दुसर्या फलंदाजाला ही 70 ते 80 धावांचे योगदान द्यावे लागेल. यापैकी काहीच नाही झाले, तर तुम्ही सामना जिंकू शकत नाही,” असेही पुढे बोलताना चोप्रा म्हणाला.
अय्यरच्या बाद होण्याने आशा संपल्या
चोप्रा पुढे म्हणाला की, भारताला चांगली सुरुवात मिळाली. परंतु झटपट शिखर धवन आणि केएल राहुल यांच्या बाद झाल्यानंतर तसेच श्रेयस अय्यरची विकेट पडल्यामुळे भारताच्या जिंकण्याच्या आशा संपल्या.
केएल राहुल योग्य क्रमांकावर खेळत नाही
भारताची सुरुवात एवढीही खराब नव्हती मी आधीही सांगितलय की, “केएल राहुल योग्य क्रमांकावर फलंदाजी करत नाही. त्याच्याकडून डावाची सुरुवात करून घेतली पाहिजे.”
राहुल आणि मयंक यांच्यासोबत न्याय होणार नाही
आकाश चोप्रा हेही म्हणाला की, आता तिसर्या सामन्यात राहुलकडून डावाची सुरुवात करणे योग्य राहणार नाही. “जर तुम्ही मयंक अगरवालला बाहेर ठेवून राहुलकडून डावाची सुरुवात केली, तर मधल्या क्रमांकावर मनीष पांडेला फक्त एकच सामना मिळेल. जे त्याच्यासाठी ठीक नाही. अशा प्रकारे तुम्ही मयंक आणि राहुल यांच्यासोबत न्याय नाही करू शकणार.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘याचे निर्णय माझ्या समजण्या पलिकडचे’, विराटवर कडाडला माजी भारतीय कर्णधार
“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”
ट्रेंडिंग लेख-
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज
या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
क्रिकेट जगतातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी ‘रन-अप’, घातक गोलंदाजीसाठी व्हायची मदत