fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘तुझी खेळभावना कुठे गेली?’, काँग्रेस नेत्याने भारतीय खेळाडूबद्दल प्रश्न केला उपस्थित

kl rahul criticised on twitter after his views on david warner injury

November 30, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट, भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात भारताला एकतर्फी पराभव स्वीकारावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या या दोन्ही विजयात सलामीवीर डेविड वॉर्नरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरला दुखापत झाली आणि तो मर्यादित षटकांच्या मालिकांमधून बाहेर पडला. त्यानंतर, भारताचा उपकर्णधार केएल राहुल याने पत्रकार परिषदेत वॉर्नरच्या दुखापतीवर केलेले वक्तव्य अनेकांना आवडले नाही. राहुलच्या या विधानाचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला गेला.

वॉर्नर मर्यादित षटकांच्या मालिकांमधून बाहेर

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेविड वॉर्नर दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या अखेरच्या वनडे सामन्यातून आणि टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे. वॉर्नर दुसर्‍या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या जागी डार्सी शॉर्टचा टी२० संघात समावेश करण्यात आला आहे. वॉर्नरने भारताविरुद्धच्या त्या पहिल्या दोन्ही वनडे सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी केल्या होत्या.

वॉर्नर बाहेर जाणे आमच्या फायद्याचे

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वॉर्नरच्या दुखापतीविषयी विचारले असता, राहुल विनोदाने म्हणाला, “वॉर्नर किती काळ संघाबाहेर राहणार हे मला माहीत नाही. मात्र, तो जितका वेळ बाहेर असेल, ते भारतीय संघासाठी फायद्याचे ठरेल.”

मात्र, राहुलचे हे वक्तव्य क्रिकेट चाहत्यांना पसंत पडले नाही. राहुलच्या या विधानामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. अनेकांनी राहुलच्या खिलाडूवृत्तीवर शंका उपस्थित केली.

काँग्रेस नेत्याने राहुलच्या खिलाडूवृत्तीवर घेतली शंका

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सदस्य अहराझ मुल्ला यांनी ट्विट करून म्हटले, ‘खेळभावना कोठे गेली? वॉर्नर जखमी झाला तरी, तुला फक्त विजयच हवा आहे.’

Where is the sportsmanship gone? So you expect winning for yeam India only if Warner gets injured? @klrahul11 https://t.co/r9GpXOj3E4

— ahraz mulla (@AhrazMulla) November 30, 2020

चाहत्यांनी धरले राहुलला धारेवर

एका चाहत्याने ट्वीट करत म्हटले, ‘राहुल एक खेळाडू आहे आणि त्याला वाटतेय वॉर्नरने दुखापतग्रस्त राहावे. एका खेळाडूची हीच का खेळभावना?

दुसऱ्या एका चाहत्याने ट्विटरवर म्हटले, ‘एक खेळाडू म्हणून राहुलने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हे बोलायला नव्हते पाहिजे. मी भारतीय आहे आणि तरीही वॉर्नरने खेळावे अशी माझी इच्छा आहे. आमच्या संघाने वॉर्नरचा समावेश असलेल्या संघाला पराभूत करावे.”

वॉर्नरने भारताविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात कर्णधार ऍरॉन फिंचसोबत अनुक्रमे १५६ व १४२ धावांची सलामी भागीदारी केली. या दोन्ही सामन्यात त्याने अर्धशतके झळकावली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘याचे निर्णय माझ्या समजण्या पलिकडचे’, विराटवर कडाडला माजी भारतीय कर्णधार

“विराटऐवजी रोहितला कर्णधार करण्याची वेळ आली?”, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”

ट्रेंडिंग लेख-

भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज

या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव

क्रिकेट जगतातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी ‘रन-अप’, घातक गोलंदाजीसाठी व्हायची मदत


Previous Post

‘विराट कोहली उतावळा कर्णधार’, भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाची टीका

Next Post

वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेसाठी बजरंग होणार रवाना, तर ‘या’ स्टार कुस्तीपटूची माघार

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@RSWorldSeries
टॉप बातम्या

पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा

January 25, 2021
Next Post

वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेसाठी बजरंग होणार रवाना, तर 'या' स्टार कुस्तीपटूची माघार

Video: महान फुटबॉलपटू मॅराडोना यांना मेस्सीकडून खास अंदाजात श्रद्धांजली

Photo Courtesy: Twitter/ ICC

आयएसएल २०२०: एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यातील सामना बरोबरीत

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.