---Advertisement---

नेटमध्ये सराव करताना टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त; धाडलं भारतात

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले २ सामने झाले असून त्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर आता तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (२ डिसेंबर) कॅनबेरा येथे होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ भारताला व्हाईटवॉश देण्याचा प्रयत्न करेल. असे असले तरीही नेट गोलंदाज म्हणून भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला आलेला वेगवान गोलंदाज ईशान पोरेलला नेटमध्ये गोलंदाजी करताना मांसपेशीत ताण आला. त्यानंतर त्याला भारतात पाठवण्यात आले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “ईशान पोरेलच्या पायाच्या मांसपेशींमध्ये दुखापत झाली आहे. त्यामुळे तो मागील काही दिवसांपासून भारतातच आहे. या दुखापतीबद्दलची गंभीरता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आकलन केल्यानंतरच कळेल.”

वेगवान गोलंदाज टी नटराजनला यापूर्वीच मुख्य संघात सामील करण्यात आले आहे. अशामध्ये पूर्णपणे नेट गोलंदाज म्हणून भारतीय संघासोबत केवळ उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी राहिला आहे.

सुरुवातीला पोरेल, त्यागी, नटराजन आणि कमलेश नागरकोटी या खेळाडूंना नेट गोलंदाजाच्या रूपात संघात सामील केले होते. दुखापतीच्या भीतीने गोलंदाजीची जबाबदारी सांभाळण्याची गरज असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी नागरेकोटीने माघार घेतली होती.

बंगालचा वेगवान गोलंदाज पोरेल आयपीएल २०२० मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा भाग होता. परंतु त्यालाही एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नव्हती. मागील हंगामात न्यूझीलंडच्या अ दौऱ्यावर चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला ४ नेट गोलंदाजांपैकी एक म्हणून संघात सामील केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

तिसऱ्या वनडे सामन्यात मुंबईकराचा १८ वर्षे जुना विक्रम शमीच्या निशाण्यावर, होऊ शकतो दिग्गजांच्या पंक्तीत सामील

‘विराट फलंदाजीला आल्यावर मला झोपेतून उठवा’, आपल्या मुलाबद्दल इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य

शाहरुख खानने विकत घेतला आणखी एक टी२० संघ, ‘या’ लीगमध्ये घेणार भाग

ट्रेंडिंग लेख-

लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्‍याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू

नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्‍यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---