भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीचा प्रत्येक जण चाहता आहे. अनेक दिग्गजांनी म्हटले आहे की, सध्याच्या काळात विराट सर्वोत्तम खेळाडूंमध्ये सामील आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू डेविड वॉर्नरच्या मधल्या मुलीला विराटसारखे बनायचे असल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले होते. त्यानंतर आता इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सांगितले आहे की, त्याचा लहान मुलगा विराटच्या फलंदाजीचा चाहता आहे. त्याला त्याची फलंदाजी पाहणे खूप आवडते.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉने एका वेबसाईटशी चर्चा करताना म्हटले की, “माझा लहान मुलगा एक छोटा खेळाडू आहे. तो मला म्हणतो की, जेव्हाही विराट फलंदाजीला येईल, तेव्हा मला झोपेतून उठवा. तसेच विराट बाद होतो, मिडविकेटवर झेलबाद होतो, तेव्हा त्यानंतर लगेच तो आपले दुसरे काम करायला लागतो. विराट मुलांवरही अशाप्रकारे प्रभाव ठेवतो.”
“जेव्हा तुम्ही विराटला शॉट खेळताना पाहता जो बॅटच्या मधोमध लागून मैदानाच्या बाहेर जातो. त्यावेळी असे वाटते की, त्याला मारण्यासाठी कोणतीही मेहनत घेतली नाही. परंतु याबद्दल माहिती पडत नाही. केवळ या शॉटनंतर चेंडू उडत उडत स्टँडमध्ये जातो. तो एक खूप खास खेळाडू आहे. तो खरंच एक जीनियस आहे,” असेही वॉ पुढे बोलताना म्हणाला.
“एक गोष्ट जी मला विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत चिंतेत टाकत नाही, ती अशी की त्याला फलंदाजीबाबत कोणतीही चिंता नसते. तो एक शानदार खेळाडू आहे. याबाबत कोणतीही शंका नाही की, तो या काळातील प्रत्येक क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम खेळाडू आहे,” असे विराटच्या फलंदाजीबद्दल बोलताना वॉ म्हणाला.
विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना सर्वात वेगवान २२ हजार आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम बनवला. तिसऱ्या सामन्यात विराटकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वात वेगवान १२ हजार धावांचा विक्रम मोडण्याचीही संधी आहे. यासाठी विराटला केवळ २३ धावांची आवश्यकता आहे. या धावा करताच तो हा मोठा विक्रम आपल्या नावावर करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘…म्हणून भारताकडे कामचलाऊ गोलंदाजांची कमतरता’, माजी यष्टीरक्षक फलंदाजाने सांगितली समस्या
पती असावा तर असा! विराटने पत्नी अनुष्काला शिकवले ‘शीर्षासन’
धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट
ट्रेंडिंग लेख-
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज