नेपीयर। भारतीय संघाने आज(23 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवत न्यूझीलंड दौऱ्याची यशस्वी सुरुवात केली आहे. यामुळे भारत 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे.
हा विजय भारतासाठी खास ठरला आहे. कारण सुमारे दहा वर्षानंतर भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध वन-डेत विजय मिळवण्यात यश आले आहे.
2008-09मध्ये भारतीय संघ एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. यामध्ये भारताने 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 3-1ने विजय मिळवला होता.
मार्च 2009ला हॅमिल्टन येथे झालेल्या वन-डे सामन्यात भारताने 84 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात विरेंद्र सेहवागने नाबाद 125 आणि गौतम गंभारने नाबाद 63 धावांची खेळी केली होती.
त्यानंतर जवळ जवळ 10 वर्षांनी आज भारताने न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध वन-डे सामन्यात विजय मिळवला आहे.
आजच्या सामन्यात भारतासमोर प्रखर सुर्यप्रकाशामुळे डकवर्थ लूईस नियमानुसार 49 षटकात 156 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.
यावेळी भारतीय सलामीवीर शिखर धवनने नाबाद 75 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिली आहे. कर्णधार विराट कोहलीनेही 45 धावांची खेळी केली आहे.
या सामन्यात भारताकडून कुलदीप यादवने 39 धावांत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने 19 धावांत 3, युजवेंद्र चहलने 43 धावांत 2 आणि केदार जाधवने 17 धावांत 1 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–त्या ५ धावा विराट कोहलीला पडल्या भलत्याच महागात!
–धोनीचा तो सल्ला कुलदीप यादवसाठी ठरला सर्वात मौल्यवान, पहा व्हिडिओ
–मोहम्मद शमीने केली कमाल, भारताकडून केली विकेट्सची सेंच्यूरी पूर्ण