झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ (ZIMvsIND) केएल राहुलच्या नेतृत्वाखाली रवाना झाला आहे. यामध्ये भारताच्या कर्णधारपदी शिखर धवनची निवड करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी कर्णधार बदलण्याने क्रिकेटविश्वात नव्या चर्चेला सुरूवात झाली. यामध्ये काहींनी धवनवर अन्याय झाला, तर राहुलने यावर्षात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नसला तरी त्याला कर्णधार का केले ही प्रश्ने निर्माण झाली. या सगळ्याकडे दुर्लक्ष करत धवनने मोठे वक्तव्य केले आहे. त्यामध्ये त्याने त्याच्या भविष्यातील कामगिरीचे विचार मांडले आहेत.
शिखर धवन (Shikhar Dhawan) भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर. त्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले “माझी वनडे विश्वचषकासाठी तयारी सुरू आहे. ज्यामुळे मला जेवढे वनडे सामने खेळता येईल तेवढे मी खेळण्याचा प्रयत्न करणार आहे.”
धवन या डावखुऱ्या फलंदाजाने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले,“मला आयसीसी स्पर्धांमध्ये खेळायला आवडते. त्यामध्ये खेळण्याची नेहमीच एक वेगळी भावना आणि समाधान असते. मी यापूर्वी काही खूप चांगल्या स्पर्धा खेळल्या आहेत. मी प्रत्येक स्पर्धेसाठी विशेष तयारी करतो आणि तसाच खेळ करतो.”
“माझे लक्ष्य पुढच्या वर्षी खेळल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषकाावर आहे. त्यासाठी मी सर्वाधिक सामने खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याआधी आयपीएल खेळली जाणार असल्याने त्यामध्येही उत्तम कामगिरी करण्याचा हेतू असणार आहे. तसेच स्वत:ला फिट ठेवण्यासाठी स्थानिक वनडे आणि टी२० सामन्यांकडेही खेळण्याचा कल असणार आहे,” असे धवनने पुढे म्हटले आहे.
नुकतेच धवनच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-० असा विजय मिळवला. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेच्या दौऱ्यातही वनडे मालिका २-१ अशी जिंकली होती.
धवन हा इंग्लंडमध्ये झालेल्या विजेत्या २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा मालिकावीरही ठरला आहे. त्याने या स्पर्धेतील ५ सामन्यांमध्ये ९०.७५च्या सरासरीने ३६३ धावा केल्या होत्या. यामध्ये २ शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या रंगात रंगला धोनी, ‘भारतीय असल्याचा अभिमान’ म्हणत जिंकले काळीज
भारतीयांना नडणाऱ्या मॅकॉयचा न्यूझीलंडविरुद्ध ‘अष्टपैलू’ खेळ, टी२०तील अद्भुत विश्वविक्रमाला गवसणी
वेस्ट इंडिजची पुन्हा घसरगुंडी! भारतानंतर न्यूझीलंडकडून टी२० मालिकेत लाजिरवाणा पराभव