---Advertisement---

चौथ्या टी२० सामन्यासाठी टीम इंडियात झाले ३ बदल, रोहितसह या खेळाडूंना विश्रांती

On: शुक्रवार, जानेवारी 31, 2020 12:18 PM
---Advertisement---

वेलिंग्टन। आज(31 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात चौथा टी20 सामना स्काय स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी 11 जणांच्या भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. भारताने रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा या तीन खेळाडूंना विश्रांती दिली आहे. तर त्यांच्याऐवजी संजू सॅमसन, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी दिली आहे. आज केएल राहुलसह सॅमसन सलामीला फलंदाजी करेल अशी माहिती कर्णधार विराट कोहलीने दिली आहे.

त्याचबरोबर या सामन्यात न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन दुखापतीमुळे खेळणार नाही. त्याला तिसऱ्या टी20 सामन्यादरम्यान डाव्या खांद्याची दुखापत झाली आहे. त्याच्याऐवजी आज न्यूझीलंड संघाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज टीम साऊथी करणार आहे.

तसेच न्यूझीलंडने त्यांच्या 11 जणांच्या संघात आज विलियम्सन ऐवजी डॅरिल मिशेलला संधी दिली आहे. तर कॉलिन डी ग्रँडहोमच्या ऐवजी टॉम ब्रुसला संधी दिली आहे.

या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत पहिल्या तीनही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताने ही मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे आता भारतीय संघ उर्वरित टी20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करेल. तर न्यूझीलंड समोर चौथा आणि पाचवा टी20 सामना जिंकून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान असेल.

चौथ्या टी20 सामन्यासाठी असे आहेत 11 जणांचे संघ –

भारत – संजू सॅमसन, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी.

न्यूझीलंड – मार्टिन गप्टिल, कॉलिन मुन्रो, टॉम ब्रूस, रॉस टेलर, टिम सेफर्ट, डॅरिल मिशेल, मिशेल सॅंटनर, स्कॉट कुग्लेइझन, टीम साऊथी (कर्णधार), ईश सोधी, हमीश बेनेट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---