संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमने-सामने होते. पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर दोन्ही संघांना या सामन्यात विजय अनिवार्य होता. मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत भारताचा डाव निर्धारित २० षटकात अवघ्या ११० धावांवर रोखला. त्यानंतर फलंदाजांनी संयमाने फलंदाजी करत संघाला ८ गड्यांनी मोठा विजय मिळवत गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. त्या सामन्यात ११० धावा केल्या नंतर विराट कोहली आणि कंपनीच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला.
भारतीय फलंदाजांची हाराकिरी
दुबई येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला कर्णधार केन विलियम्सन याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरविला. भारतीय संघातील कोणताही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्ट याने सर्वाधिक तीन तर ईश सोढीने दोन बळी मिळवले. भारतासाठी अष्टपैलू रवींद्र जडेजा याने अखेरपर्यंत नाबाद राहत २६ धावांचे योगदान दिले. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही वरिष्ठ भारतीय फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.
भारतीय संघाचा नकोसा विक्रम
या सामन्यात भारतीय संघ ११० धावांच्या पुढे न गेल्याने भारतीय संघाची टी२० विश्वचषकातील ही दुसरी निच्चांकी धावसंख्या ठरली. टी२० विश्वचषकातील भारताची सर्वात निच्चांकी धावसंख्या देखील न्यूझीलंडविरुद्ध नोंदवली गेली होती. २०१६ विश्वचषकात नागपूर येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघ केवळ ७९ धावांमध्ये सर्वबाद झाला होता. २००९ टी२० विश्वचषकात नॉटिंगहॅम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाला २० षटकात केवळ ८ बाद ११८ धावा काढण्यात यश आले होते. २०१४ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध फक्त १३० धावा करु शकलेला.
महत्त्वाच्या बातम्या-
T20 WC 2021, INDvsNZ : न्यूझीलंडकडून टीम इंडिया चारीमुंड्या चीत, विराटसेनेचा ८ विकेट्सने पराभव
दुष्काळात तेरावा महिना! बांगलादेशला मोठा धक्का, टी२० विश्वचषकातून शाकिब अल हसन बाहेर
विराटचे सोढीपुढे पुन्हा लोटांगण! टी२० मध्ये ‘इतक्यांदा’ फसवले जाळ्यात






