भारत आणि पाकिस्तान या दोन संघादरम्यान कोणत्याही प्रकारचे व्दिपक्षीय क्रिकेट 2009 पासून खेळले जात नाही. या दोन्ही संघांचा सामना फक्त आयसीसीच्या स्पर्धेत होत असतो.
याच कारणामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नुकसान होत असून त्यांनी याची भरपाई म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून 70 लाख डॉलरची(500 कोटी) मागणी केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या मागणी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन आणि अनुराग ठाकुर यांनी धुडकावून लावली आहे.
पीसीबीने बीसीसीआय समोर दोनदा व्दिपक्षीय सामन्यांचे आयोजन करण्याची मागणी केली होती. ती फेटाळल्यामुळे पीसीबीचे 500 कोटींचे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले होते. आसीसीने यावर एक समिती स्थापन करत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची सुनावणी 1 ऑक्टोबर पासून दुबईत होणार आहे.
आयसीसीच्या आचारसंहिता आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असलेले वकिल मायकेल बेलॉफ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीच्या सुनावणीला हजेरी लावण्याचा प्रश्नच येत नसल्याचे बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
“बीसीसीआयने सुनावणी दरम्यान काहीच गैर केले नसून तरीही आयसीसीेने बीसीसीआयला त्या सुनावणीला बोलवण्याचे काहीही कारण नसून हा भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डांच्या मधील प्रश्न आहे. त्यामुळे आसीसीने कोणत्याही प्रकारचा दबाव बीसीसीआयवर आणू नये”, असे ठाकूर यांनी सांगितले.
“भारत पाकिस्तानला एकही रूपया देणारनसून आधी दहशतवाद थांबवा मग क्रिकेट खेळण्याविषयी बोलू”, असेही भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
आयसीसीचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन देखील ह्या सुनावनीला उपस्थित राहणार नाहीत.
महत्वाच्या बातम्या-
–या कारणामुळे सौरव गांगुली निवडसमितीवर नाराज
–अशी आहे एशिया कप स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंची यादी
-विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, दोन मोठ्या खेळाडूंचा संघात समावेश