येत्या २६ डिसेंबर पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका (india vs south africa) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू जोरदार सराव करण्यात व्यस्त आहेत. तसेच ही मालिका एक खास मालिका असणार आहे. ज्यामुळे बीसीसीआयने खास आयोजन देखील केले आहे.(cricket South Africa)
या मालिकेतील पहिला कसोटी सामना झाल्यानंतर दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गमध्ये पार पडणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खास असणार आहे. कारण दोन्ही संघांच्या क्रिकेट संबंधांना ३० वर्ष पूर्ण होणार आहेत. तसे पाहायला गेले तर, दक्षिण आफ्रिका क्रिकेटचा इतिहास खूप मोठा आहे. परंतु, रंगभेदामुळे १९७० पासून ते १९९१ पर्यंत दक्षिण आफ्रिकेला क्रिकेटपासून दूर ठेवण्यात आले होते. कारण, देशात कृष्णवर्णीय खेळाडूंवर वांशिक भेदभाव केला जात होता.
हे निर्बंध १९९१ मध्ये काढण्यात आले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ भारतात आला होता. १० नोव्हेंबर १९९१ क्लाईव्ह राइस यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघाविरुद्ध पहिला सामना खेळला.
त्यानंतर केपलर वेसेल्सच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने नोव्हेंबर १९९२ मध्ये डर्बन येथे मायदेशातील पहिला कसोटी सामना खेळला. हा सामना देखील भारतीय संघाविरुद्ध झाला होता. या सामन्यात सचिन तेंडुलकरने खणखणीत शतक झळकावले होते. तर अनिल कुंबळेने ८ गडी बाद केले होते. या खास दौऱ्याला ३० वर्ष पूर्ण होणार आहेत. यावर्षी दोन्ही संघ जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसून येणार आहेत.
तसेच क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने म्हटले की, “भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील क्रिकेट संबंधांचा ३० वर्षांचा वर्धापन दिन साजरा केला जाईल. ज्यामध्ये स्टेडियमच्या ३० वर्षांच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय क्षण आणि व्यक्तींची ओळख यांचा समावेश असणार आहे.”
महत्वाच्या बातम्या:
रवींद्र जडेजावरही चढला ‘पुष्पा’ चित्रपटाचा फिव्हर; शेअर केलेल्या व्हिडिओवर अल्लू अर्जुनची खास कमेंट
हे नक्की पाहा: