श्रीलंका संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना बारसपारा स्टेडियम, गुवाहाटी येथे रविवारी(5 जानेवारी) होणार होता. मात्र या खेळपट्टीत ओलावा असल्याने सामना रद्द करण्यात आला.
सामन्यामध्ये नाणेफेक झाल्यानंतर पाऊस सुरू झाला होता. पण नंतर थोडयावेळाने पाऊस थांबला परंतु खेळपट्टी ओली राहिल्याने सामना होऊ शकला नाही. मैदानातील कर्मचारी सामन्यासाठी मैदान सुकवण्याचा प्रयन्त करत होते. मात्र यासाठी ते असमर्थ ठरले. पण स्टेडियममध्ये आलेले प्रेक्षक सामना सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होते.
मैदाने सुकवत असताना प्रेक्षक गाणी गात होते आणि मोबाईल फ्लॅशलाइट लावून त्यानी त्यांचा उत्साह व्यक्त केला.
त्याचबरोबर प्रेक्षकांनी एकावेळी वंदे मातरमही एकजुटीने गायले. बीसीसीआयने प्रेक्षकांचा वंदे मातरम् गातानाचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.
Guwahati, you beauty 😍#INDvSL pic.twitter.com/QuZAq7i1E3
— BCCI (@BCCI) January 5, 2020
गुवाहाटीमध्ये टी20 दरम्यान पाऊस वेळेवर थांबला होता. परंतु खेळपट्टी सुकवण्यासाठी 2 तास ग्राउंड स्टाफने प्रयत्न केल्यानंतरही अपयश आल्याने अखेर सामना रात्री 9.55 च्या दरम्यान रद्द करण्यात आला.
यावेळी खेळपट्टी सुकवण्यासाठी सुपर सॉपरबरोबरच इस्त्री आणि हेअर ड्रायरचीही मदत घेण्यात आली. ज्यामुळे सध्या बीसीसीआयवर टीका होत आहे. मात्र एवढे प्रयत्न करुनही खेळपट्टी खेळण्यासाठी योग्य नसल्याने सामना रद्द करण्यात आला.
श्रीलंका विरुद्ध कितीही धावा केल्या तरी शिखरपेक्षा हा खेळाडूच भारी!
वाचा- 👉https://t.co/wcDhwmTUbn👈#म #मराठी #Cricket @SDhawan25
— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020
जो विक्रम सचिनने भारतासाठी केला तोच विक्रम टेलरने न्यूझीलंडसाठी केला!
वाचा👉https://t.co/2tGbxUFMhj👈#म #मराठी #Cricket #AUSvNZ @RossLTaylor— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020