भारतीय क्रिकेट संघ नुकताच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतला आहे. आता भारतीय संघाला फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ( India vs West Indies) ३ सामन्यांची वनडे आणि ३ सामन्यांनी टी२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकांसाठी भारताचे संघ जाहीर झाले असून आपण टी२० संघाबद्दल जाणून घेऊ.
कर्णधार रोहितचे पुनरागमन
भारताच्या मर्यादीत षटकांचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकांमधून भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. तसेच तो भारतीय संघाचे नेतृत्त्वही करताना दिसेल. रोहितला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी दुखापत झाली होती. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाबरोबर गेला नाही. पण आता रोहित पूर्ण तंदुरुस्त असून भारताच्या संघाचे नेतृत्त्व करण्यास सज्ज आहे. तसेच केएल राहुल उपकर्णधारपद सांभाळेल.
युवा खेळाडूंना संधी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांसारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे भारताच्या टी२० संघात अनेक नवे चेहेरे दिसून आले आहेत. भारताच्या टी२० संघात संधी मिळालेल्या युवा खेळाडूंमध्ये इशान किशन, वेंकटेश अय्यर, अवेश खान, हर्षल पटेल, रवी बिश्नोई आशा खेळाडूंचा समावेश आहे. यातील अवेश खान (Avesh Khan) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) या दोघांना वनडे संघातही स्थान मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी असणार आहे.
अधिक वाचा – वनडे क्रमवारी: भारताच्या विराट कोहली, रोहित शर्माला मोठे नुकसान, पाहा कोण कितव्या स्थानावर
भूवी, अक्षरला टी२० संघात संधी
वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमारला वनडे संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे तो केवळ टी२० संघात खेळताना दिसेल. तसेच फिरकीपटू अक्षर पटेल अद्याप दुखापतीतून सावरत असल्याने त्याला वनडे मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही, मात्र तो टी२० मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करेल.
याशिवाय रविंद्र जडेजाही पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापाठोपाठ वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकांसाठीही भारतीय संघात संधी देण्यात आलेली नाही.
व्हिडिओ पाहा – आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय
अशी होईल टी२० मालिका
भारत आणि वेस्ट इंडिज संघात वनडे मालिकेनंतर १६ फेब्रुवारीपासून टी२० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे १८ आणि २० फेब्रुवारी रोजी पार पडेल. हे तिन्ही सामने कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहेत.
T20I squad: Rohit Sharma(Capt),KL Rahul (vc),Ishan Kishan,Virat Kohli,Shreyas Iyer,Surya Kumar Yadav, Rishabh Pant (wk),Venkatesh Iyer,Deepak Chahar, Shardul Thakur, Ravi Bishnoi,Axar Patel, Yuzvendra Chahal, Washington Sundar, Mohd. Siraj, Bhuvneshwar, Avesh Khan, Harshal Patel
— BCCI (@BCCI) January 26, 2022
भारताचा टी२० संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघातील ३ न्यू कमर्स, ज्यांना मिळू शकते वनडे पदार्पण करण्याची संधी