स्वप्नांना सीमा नसतात असे म्हणतात, क्रिकेट जगतातील अनेक खेळाडूंनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. वाईट परिस्थितीशी झुंज देत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचं स्वप्न त्यांनी साकार केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायननेही खडतर परिस्थितीचा सामना करत जिद्द आणि मेहनतीच्या बळावर राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं.
काही वर्षांपूर्वी मैदानावर कापत होता गवत
नॅथन लायन काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील ऍडिलेड मैदानाची देखभाल करत होता. गवत कापण्यापासून मैदानातील इतर व्यवस्थेकडे लक्ष देणे हे त्याचे काम होते. आता याच लायनने अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आज (20 नोव्हेंबर) त्याचा 34 वा वाढदिवस आहे.
लायनला 400 बळींचा आकडा गाठायला हवी फक्त 1 विकेट्स
या ऑस्ट्रेलियच्या फिरकीपटूने आतापर्यंत 100 कसोटीत 399 बळी घेतले आहे. ऑस्ट्रेलिया संघातर्फे कोणत्याही फिरकीपटूने घेतलेले हे सर्वाधिक बळी आहेत. 400 बळींचा आकडा पूर्ण करायला त्याला 1 बळीची आवश्यकता आहे.
लायनने खेळलेत 100 कसोटी सामने
तसेच, कारकिर्दीत 100 कसोटी सामने लायनने याचवर्षी जानेवारी महिन्यात पूर्ण केले. भारताविरुद्ध ब्रिस्बेन येथे झालेला कसोटी सामना त्याचा कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना ठरला होता. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासात 100 कसोटी सामने खेळणारा लायन हा दहावा खेळाडू आहे.
चांगली कामगिरी करण्याची वाढली भूक
लायनने यावर्षी जानेवारीत शेवटचा कसोटी सामना खेळला होता. गेल्यावर्षी कोव्हिड -19 या साथीच्या आजारामुळे काही काळ क्रिकेट सामन्यांचे आयोजन झाले नव्हते. लायनच्या मते, मिळालेल्या विश्रांतीमुळे त्याची चांगली कामगिरी करण्याची भूक वाढली आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला होता, “मिळालेल्या विश्रांतीमुळे कदाचित या खेळाशी असलेल्या आपुलकीत अधिक भर पडली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: भारताची स्टार कुस्तीपटू बबीता फोगटबद्दल खास ५ गोष्टी घ्या जाणून
आईच्या मदतीने सुरु झाली होती डिविलियर्सची प्रेमकहानी, भारतातच केले होते प्रपोज