भारतीय क्रिकेट संघ या वर्षी जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत ३ टी२० सामने, ३ वनडे सामने आणि ५ कसोटी सामने होणार आहेत.
सध्या भारतातील खेळाडू अायपीएलमध्ये खेळत असून २७ मे रोजी आयपीएलचा सांगता होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ बेंगलोरला १४ ते १८ जून रोजी बेंगलोर येथे कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यातून अफगाणिस्तान कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.
त्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार असून भारतीय संघ तेथे २ टी२० सामने खेळणार आहे. या दौऱ्यात पहिला सामना २७ जून तर दुसरा सामना २९ जून रोजी होणार आहे.
हे दोन्ही छोट्या मालिका संपल्यावर संघ इंग्लडला रवाना होईल. या दौऱ्यातील पहिला टी२० सामना ३ जुलै रोजी ओल्ड ट्रॅफिओर्ड येथे दुसरा सामना कार्डिफ येथे तर तिसरा सामना ब्रिस्टॉल येथे होणार आहे.
वनडे मालिकेतील पहिला सामना १२ जुलै रोजी ट्रेंट ब्रिज, दुसरा कसोटी सामना १४ जुलै रोजी लॉर्ड्स येथे तर तिसरा सामना हेडींगले येथे होणार आहे.
कसोटी मालिका १ ऑगस्ट रोजी सुरु होणार असून पहिला सामना एडगबास्टोन येथे, दुसरा सामना लॉर्ड्स येथे, तिसरा सामना ट्रेंट ब्रिज येथे, चौथा सामना अगेस बॉवेल तर शेवटचा सामना किया ओव्हल येथे होणार आहे.
भारतीय संघ २०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली येथील कसोटी मालिका १-३ अशी पराभूत झाला होता.
भारताच्या इंग्लंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
टी२० मालिका
३ जुलै । पहिली टी२० । ओल्ड ट्रॅफिओर्ड
६ जुलै । दुसरी टी२० । कार्डिफ
८ जुलै । तिसरी टी२० । ब्रिस्टॉल
वनडे मालिका
१२ जुलै । पहिली वनडे । ट्रेंट ब्रिज
१४ जुलै । दुसरी वनडे । लॉर्ड्स
१७ जुलै ।तिसरी वनडे । हेडींगले
कसोटी मालिका
१ ते ५ ऑगस्ट । पहिली कसोटी । एडगबास्टोन
९ ते १३ ऑगस्ट । दुसरी कसोटी लॉर्ड्स
१८ ते २२ ऑगस्ट । तिसरी कसोटी । ट्रेंट ब्रिज
३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर । चौथी कसोटी । अगेस बॉवेल
७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर । पाचवी कसोटी । किवा ओव्हल