न्यूझीलंडविरुद्ध दोन्ही मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाला या महिन्यात दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (south africa tour of india) जायचे आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर भारताला तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यात भारतीय संघाला सुरुवातील कसोटी मालिका खेळायची आहे. त्यासाठी कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (rohit sharma), यष्टीरक्षक रिषभ पंत (rishabh pant), सलामीवीर केएल राहुल (kl rahul), तसेच अजिंक्य राहाणे (ajinkya rahamne) हे सध्या मुंबई क्रिकेट एसोसिएशनच्या बीकेसीमध्ये कसून सराव करत आहेत.
तत्पूर्वी अजिंक्य रहाणेला हॅमस्ट्रिंग इंजरी (स्नायूंमध्ये तान) झाली असल्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याला सहभागी होता आले नव्हते. तर रोहित आणि पंत बऱ्याच दिवसांपासून बायो बबलमध्ये असल्यामुळे त्यांना देखील कसोटी मालिकेत विश्रांती दिली गेली होती. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार केएल राहुलच्या मांडीच्या स्नायूंना तान आल्यामुळे त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती.
एक विश्वसनीय सूत्राने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, हे खेळाडू बीकेसीमध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी सराव करत होते. सूत्रांनी सांगितले, “सर्व खेळाडूंनी दुपारी २ वाजल्यापासून सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत नेट्समध्ये मेहनत केली. कारण मुख्य मैदानावर ओडिसा आणि आंध्र यांच्यातील विजय हजारे ट्रॉफीतील सामन्याचे आयोजन केले गेले होते. त्यामुळे खेळाडूंनी नेट्स सरावावर लक्ष केंद्रित केले.”
दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुनराहने देखील सरावादरम्यानचा एक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे, पण तो व्हिडिओ बीकेसीमधील आहे की, इतर कोणत्या ठिकाणच्या याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरू होण्याआधी देखील भारतीय संघाच्या खेळाडूंना बीकेसीमध्ये सराव करताना पाहिले गेले होते. त्यावेळी अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, जयंत यादव आणि इशांत शर्मा यांनी बीकेसीच्या मैदानावर चांगलीच मेहनत घेतली होती.
दक्षिण अफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेचे वेळापत्रक –
दक्षिण अफ्रिका विरुद्ध भारत हा पहिला कसोटी सामना २६ ते ३० डिसेंबर दरम्यान सेंचुरियनमध्ये खेळला जाणार आहे. उभय संघातील दुसरा कसोटी सामना ३ ते ७ जानेवारी या काळात जोहान्सबर्गमध्ये खेळला जाईल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना ११ ते १५ जानेवारीला केपटाउनमध्ये खेळला जाईल. भारतीय संघ या दौऱ्यासाठी १६ डिसेंबरला रवाना होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
मातब्बर गोलंदाज झुलन गोस्वामीच्या बायोपिकमधून बाहेर झाली विराटची पत्नी अनुष्का शर्मा, पण का?
रोहित वनडेचा कॅप्टन बनताच ‘या’ ३ खेळाडूंच्या स्थानावर असेल टांगती तलवार! विराटचे आहेत लाडके शिलेदार