भारताचा श्रीलंका दौरा 27 जुलैपासून सुर होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर ( Ajit Agarkar) यांची सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेण्यात आली. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी या दोघांनी संघ निवड आणि भारतीय संघाच्या भविष्यासंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
भारताच्या संघ निवडीनंतर शेवटच्या सामन्यात चांगली कामगिरी करुनही काही खेळाडूंना संधी का दिली जात नाही, असा प्रश्नही पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर सॅसमन, गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांच्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर अजित आगरकर म्हणाला, “ज्या खेळाडूला संधी मिळाली नाही तो स्वत:ला दुर्दैवी समजतो. आमचं त्या खेळाडूला आव्हान आहे की, आम्हाला फक्त 15 खेळाडू निवडायचे आहेत. आम्ही सर्वोत्तम संघ निवडण्याचा प्रयत्न करतो.”
पुढे बोलताना आगरकर म्हणाला, “झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत काही खेळाडूंना संघात स्थान देण्याची आम्हाला संधी होती. जी चांगली गोष्ट आहे. तुम्ही पाहा की रिंकू सिंहचा (Rinku Singh) काही दोष नव्हता पण तो टी20 विश्वचषक खेळू शकला नाही. हे फक्त एक उदाहरण आहे. टी20 विश्वचषकापूर्वी तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता. पण कधी कधी अशा काही गोष्टी घडतात. दुर्दैवाने, आम्ही 15 खेळाडूंपैकी प्रत्येकाला संधी देऊ शकत नाही.”
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी20 आणि एकदिवसीय संघ
भारताचा टी20 संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज
भारताचा एकदिवसीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा
भारत-श्रीलंका वेळापत्रक
(27 जुलै) पहिला टी20 सामना, पल्लेकेले
(28 जुलै) दुसरा टी20 सामना, पल्लेकेले
(30 जुलै) तिसरा टी20 सामना, पल्लेकेले
(2 ऑगस्ट) पहिला वनडे सामना, कोलंबो
(4 ऑगस्ट) दुसरा वनडे सामना, कोलंबो
(7 ऑगस्ट) तिसरा वनडे सामना, कोलंबो
महत्त्वाच्या बातम्या-
‘फॅब फोर’च्या शर्यतीत विराट पडला मागे, जो रुटची मोठी आघाडी; लारा-द्रविडचा विक्रमही धोक्यात
लवकरच होणार या वेगवान गोलंदाजाचं भारतीय संघात पुनरागमन; अजित आगरकर यांनी केला मोठा खुलासा
इंग्लंडच्या विजयामुळे भारतीय संघाचं नुकसान? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल