वेस्टइंडीज येथे सुरू असलेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषकात (U19 Cricket World Cup West Indies 2022) भारतीय संघाने (India U19 Cricket Team) शानदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. या संघातील सर्व खेळाडूंचे त्यांच्या खेळामुळे कौतुक केले जातेय. भारताच्या गोलंदाजी आक्रमणाचा प्रमुख असलेला डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज रवी कुमार (Ravi Kumar) याला तो अद्याप वेस्ट इंडीजमध्ये असतानाच एक खूषखबर मिळाली आहे.
या संघात केला गेला समावेश
आपल्या अप्रतिम स्विंग गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या रवी कुमार याचा आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी बंगाल संघात समावेश केला जाणार आहे. बंगाल संघाला रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी एलिट ब गटामध्ये स्थान दिले गेले आहे आहे. या गटामध्ये बंगालसह चंदिगड, हैदराबाद व बडोदा या संघांचा समावेश आहे. बंगाल १६ फेब्रुवारीपासून कटक येथे आपल्या रणजी मोहिमेची सुरुवात करेल. दोन वर्षानंतर भारतातील सर्वात मोठी प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफी चा हंगाम या वर्षी दोन भागांमध्ये खेळला जाणार आहे. याची सुरुवात १६ फेब्रुवारीपासून होईल.
बंगाल संघाचा माजी कर्णधार व अनुभवी यष्टीरक्षक रिद्धिमान साहा हा पहिल्या किंवा पहिल्या दोन सामन्यांसाठी संघासोबत नसेल. भारत व श्रीलंका यांच्यादरम्यान होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये सामील व्हावे लागेल. रवी कुमारव्यतिरिक्त १९ वर्षाखालील संघाचा सदस्य असलेल्या यष्टीरक्षक अभिषेक पुरेल याचा देखील बंगाल संघात समावेश केला जाईल. भारताचे माजी सलामीवीर व बंगाल १९ वर्षाखालील संघाचे प्रशिक्षक देवांग गांधी यांनी या निर्णयाबद्दल बंगाल क्रिकेट संघटनेचे आभार मानले आहेत. ते म्हणाले,
“कोणत्याही प्रशिक्षकाला एक ज्युनियर खेळाडू एलिट लेव्हल संघामध्ये सामील झाल्यामुळे समाधान मिळेल. प्रशिक्षकाला प्रतिभावान खेळाडूंना योग्य दिशेने न्यायचे असते. जर रवी आणि अभिषेक पोरेलने रणजी संघात स्थान मिळवले तर माझ्यापेक्षा कोणीही आनंदी होणार नाही.”
याव्यतिरिक्त पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री व माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी (Sports Minister Manoj Tiwari) हेदेखील आगामी रणजी हंगामात संघाचा भाग असू शकतात.
महत्वाच्या बातम्या-
“मला एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायचंय”, युवा भारतीय खेळाडूने व्यक्त केली इच्छा
विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यावर काय होती प्रतिक्रिया? शार्दुल ठाकूरचा खुलासा