आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी२० विश्वचषकासाठी नुकतेच गट जाहीर केले आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानविरुद्ध टी२० मध्ये भारतीय संघाने आत्तापर्यंत प्रथम कामगिरी केली असून, हीच कामगिरी कायम राखण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. हा विश्वचषक संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत.
दोन वर्षानंतर आमने-सामने येणार उभय संघ
दोन वर्षानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ आपआपसात भिडतील. अखेरच्या वेळी हे दोन्ही संघ २०१९ वनडे विश्वचषकात भिडले होते. त्यावेळी भारतीय संघाने पाकिस्तानला ८९ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केलेले. त्या सामन्यात रोहित शर्माने १४० धावांची मोठी खेळी केली होती. भारताने ५ गडी गमावून ३३६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ ६ गडी गमावून २१२ धावा करू शकला. पावसामुळे पाकिस्तान संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार ४० षटकांत ३०२ धावांचे लक्ष्य मिळाले होते.
टी२० क्रिकेटमध्ये भारत वरचढ
भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका अनेक वर्षापासून होत नाहीत. अशा परिस्थितीत दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येतात. दोन्ही संघातील आतापर्यंत झालेल्या टी२० सामन्यांविषयी बोलायचे झाल्यास, उभय संघ एकूण ८ वेळा एकमेकांविरुद्ध खेळावे आहेत. यामध्ये भारताने ६ विजय मिळविले आहेत तर, पाकिस्तान केवळ एक सामना जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. पाकिस्तानला हा एकमेव विजय २०१२ मध्ये मिळाला होता. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा संघ ९ वर्षांपासून भारताविरुद्ध टी२० सामना जिंकलेला नाही. त्यानंतर झालेले चारही सामने भारताने जिंकले आहेत.
विश्वचषकात भारत अपराजित
वनडे विश्वचषकाप्रमाणे भारतीय संघ टी२० विश्वचषकातही पाकिस्तान विरुद्ध अपराजित राहिला आहे. पाचवेळा दोन्ही संघ टी२० विश्वचषकात भिडले असताना या सर्व सामन्यात भारताने विजय मिळवला. २००७ विश्वचषकात साखळी तसेच अंतिम सामन्यात भारतीय संघाने विजय मिळविला होता. त्यानंतर २०१२, २०१४ व २०१६ विश्वचषकातही भारताने विजय साजरा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राहुल-अथियाच्या नात्यावर सुनिल शेट्टींनी सोडले मौन; म्हणे, ‘हे जोडपं एकमेकांना शोभून दिसतं’
बळींचा पंच घेत वयाची तिशी पार केलेल्या बांगलादेशच्या ‘या’ गोलंदाजाने रचला इतिहास, ठरला पहिलाच
‘पुजाराला संघातून वगळलं जातंय, मला विश्वासच बसत नाही,’ माजी क्रिकेटरचे भाष्य