वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा (Icc under 19 world cup) थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय १९ वर्षाखालील संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघाने आयर्लंड (India vs Ireland) संघावर १७४ धावांनी जोरदार विजय मिळवला आहे. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघासमोर ३०८ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ अवघ्या १३३ धावांवर संपुष्टात आला.
या सामन्यात आयर्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून अंगक्रिश रघुवंशी आणि हरनुर सिंग फलंदाजी करण्यासाठी आले होते. दोघांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. भारतीय संघाकडून अंगक्रिश रघुवंशीने (Angakrish raghuvanshi) ७९ चेंडूंचा सामना करत ७९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि २ षटकार मारले होते, तर हरनुर सिंगने (Harnur singh) १०१ चेंडूंचा सामना करत ८८ धावांची खेळी केली.
तसेच राज बावाने ४२ आणि निशांत सिंधूने ३६ धावांचे योगदान दिले. शेवटी राजवर्धन हंगरगेकरने तुफानी खेळी करत अवघ्या १७ चेंडूंमध्ये ५ षटकार एक चौकराच्या साहाय्याने ३९ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ३०० धावांचा पल्ला गाठण्यात यश आले.
आयर्लंडचा डाव अवघ्या १३३ धावांवर संपुष्टात
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या १३३ धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात आयर्लंड संघाकडून स्कॉट मॅकबेथने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली. तर भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अनिश्वर गौतमने आणि कौशल तांबे यांना प्रत्येकी २-२ गडी बाद करण्यात यश आले होते. भारतीय संघाने सुरिवातीच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. आता भारतीय संघाचा पुढील सामना २२ जानेवारी रोजी युगांडा संघाविरुद्ध पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
‘पालघर एक्सप्रेस’चा दक्षिण आफ्रिकेत बोलबाला!! ‘हा’ पराक्रम करणारा शार्दुल एकमेव भारतीय
बीबीएल पदार्पणातच उन्मुक्त चंद फेल; लामिछानेने असं फसवलं फिरकीच्या जाळ्यात, पाहा व्हिडिओ
हे नक्की पाहा: