---Advertisement---

चाहत्यांच्या अपेक्षांवर पुन्हा पाणी, विराट कोहलीकडून डोमेस्टिक क्रिकेटमध्येही धावा निघेना…!

On: शुक्रवार, जानेवारी 31, 2025 11:45 AM
---Advertisement---

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन निराशाजनक ठरले. 12 वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी आलेला विराट कोहली पहिल्या डावात स्वस्तात बाद झाला. ज्यात त्याने 15 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने केवळ 6 धावा केल्या. हिमांशू सांगवानने त्याला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रणजी ट्रॉफीच्या 7 व्या फेरीत दिल्लीचा रेल्वे विरुद्धचा सामना सुरू आहे. पहिल्या डावात खेळताना रेल्वेने 241 धावा केल्या. ज्याला प्रत्युत्तर म्हणून दिल्लीने 100 धावांत चार विकेट गमावल्या आहेत. दिल्लीला विराट कोहलीकडून मोठ्या धावांची अपेक्षा होती. परंतु त्याने खेळाडूंसह चाहत्यांना निराश केले.

यश धुल बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानावर आला. विराट कोहलीचे मैदानावर खूप उत्साहाने स्वागत करण्यात आले. त्याने 5व्या चेंडूवर धाव घेऊन आपले खाते उघडले. 28 व्या षटकात त्याने हिमांशूला चौकारही मारला. पण पुढच्याच चेंडूवर, पुढे जाऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असताना, तो चेंडू हुकला आणि चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडच्या मध्ये गेला आणि थेट स्टंपवर आदळला.

कोहलीने डावात 15 चेंडूंचा सामना केला. ज्यात 1 चौकाराच्या मदतीने 6 धावा केल्या. विराटला बाद करून हिमांशू सिंगने आक्रमक सेलिब्रेशन केले. ज्याचं कारणही तसं आहे, पहिले म्हणजे, त्याने विराट कोहलीची मोठी विकेट घेतली आणि दुसरे म्हणजे, त्याने इतक्या महान फलंदाजाला क्लीन बोल्ड केले. कोहली बाद होताच मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षक एक एक करून स्टेडियम सोडू लागले आहेत.

डीडीसीएला विराट कोहलीचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन संस्मरणीय बनवायचे होते. ज्यामुळे त्यांनी चाहत्यांसाठी मोफत प्रवेशाची व्यवस्थाही केली. परंतु विराटने चाहत्यांची निराशा केली. मात्र, दुसरा डाव अजून बाकी आहे. दुसऱ्या डावात किंग कोहली आपला उत्तम फॉर्म दाखवेल अशी चाहत्यांना आशा असेल.

हेही वाचा-

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, या संघाच्या नावे लज्जास्पद विक्रमाची नोंद
IND vs ENG: पुणे टी20 सामन्यासाठी MCA स्टेडियम सज्ज! सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी या दिवशी भारतीय संघ दुबईला रवाना होणार, स्पर्धेपूर्वी टीम इंडियाबाबत मोठे अपडेट्स समोर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---