भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी (29 नोव्हेंबर) दुसरा वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने 89 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 22000 धावाही पूर्ण केल्या. विराटने हा पराक्रम करताच त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यातच भारताचा युवा फलंदाज सूर्यकुमार यादवनेही त्याचे अभिनंदन केले आहे.
मुंबई इंडियन्स संघाचा महत्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने विराट कोहलीला ट्विट करून शुभेच्छा दिल्या. मात्र या ट्विटनंतर चाहत्यांनी त्याची खिल्ली उडवली आहे.
काही दिवसांआधी विराट कोहलीबद्दल केलेल्या एका वादग्रस्त ट्विटला सूर्यकुमारने लाईक केले होते. त्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका झाली होती. या टीकेनंतर सूर्यकुमारने या ट्विटला अनलाइक केले होते. त्या घटनेपासून सूर्यकुमारने विराटबद्दल केलेल्या प्रत्येक ट्विटवर त्याला टीकेचा सामना करावा लागला.
22,000 International Runs @imVkohli 👏🔥👌
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) November 29, 2020
Interesting game. King Kohli and KLass Rahul can set it up nicely with Hardik to come 🤞 #AUSvsIND
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) November 29, 2020
आयपीएल दरम्यान विराट-सुर्यकुमारमध्ये दिसली खुन्नस –
आयपीएल २०२०मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यादरम्यान विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव यांच्यामध्ये खुन्नस पाहायला मिळाली होती. पण त्यासामन्यानंतर विराटने आपले कौतुक केल्याचे काहीदिवसांपूर्वी सुर्यकुमारने सांगितले आहे.
Sky bhai makkhan laga rahe😉😂❣️
— Walter White (@AsimLucknow) November 29, 2020
https://twitter.com/dul1110/status/1333034899201282050?s=19
Application for squad 👍
— MUTHUKUMAR R (@iammuthukumar96) November 30, 2020
Maska 🤣
— Snehal Sawant (@SnehalS06359401) November 30, 2020
Bhai take it easy.. ye sb nahi bhi krega toh chalega!!
— Amresh Singh (@iamresh08) November 29, 2020
Makhan lagaye jao.
— Muhammad Pervez (@pervezbaqi) November 29, 2020
विराटला ट्रोल करणाऱ्या ट्विटला केलं लाईक –
आयपीएलनंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला ट्रोल करणाऱ्या वादग्रस्त ट्विटला सूर्यकुमारने लाईक केलं होतं. विराट कोहलीबद्दल एक मीम शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये कोहलीचा उल्लेख ‘पेपर कॅप्टन’ असा करण्यात आला होता. तथापि, सूर्यकुमारने त्या ट्विटला अनलाइक केल्यावरही ते ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
पण त्यानंतर काहीदिवसांनी सुर्यकुमारने विराटबद्दल कौतुकास्पद ट्विटही केले होते. त्यामुळे आता चाहते सुर्यकुमारला ट्रोल करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा’ विक्रम करत कोहलीने धोनीलाही टाकले मागे, दिग्गज कर्णधारांच्या पंक्तीत मिळविले स्थान
सात वर्षात पहिल्यांदाच विराटच्या नेतृत्वात झाला ‘असा’ लाजिरवाणा पराभव
‘हिटमॅन’शिवाय यश मिळेना! रोहितविना खेळणाऱ्या भारतीय संघाची आकडेवारी पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य