---Advertisement---

बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी स्टीव स्मिथचा भारतीय संघाला सल्ला; म्हणाला…

On: मंगळवार, डिसेंबर 22, 2020 6:16 PM
---Advertisement---

भारतीय संघाला एॅडलेडमध्ये गुलाबी चेंडूवरील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून 8 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 26 डिसेंबरला बॉक्सिंग डे दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने भारतीय संघाला सल्ला देताना म्हणाला, त्यांनी पहिल्या सामन्यातील पराभव विसरून पुढील सामन्यावर लक्ष द्यावे.

ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क या त्रिकूटाने भारतीय संघाला अडचणीत आणताना कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी 36 धावसंख्येवर बाद केले होते.

स्टीव्ह स्मिथ हा मालिकेचे अधिकृत प्रसारणकर्ता सोनी नेटवर्कच्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत म्हणाला, “त्यादिवशी आपण शानदार वेगवान गोलंदाजी पाहिली होती. हे कदाचित मागील जवळपास पाच वर्षांत आमच्या गोलंदाजांचे सामूहिक पद्धतीचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन होते. ते शानदार टप्प्यावर गोलंदाजी करत होते. कधीकधी असे होते की तुम्हाला चांगला चेंडू मिळतो आणि आपल्या बॅटची कडा घेवून क्षेत्ररक्षक झेल पकडतात. आपल्याला हे विसरून पुढे जायचे असते आणि स्वतःला सकारात्मक मानसिकतेत ठेवायचे असते.”

मोठ्या फरकाने पराभूत झालेल्या भारतीय संघाबद्दल काय विचार करता, या प्रश्नावर बोलताना स्मिथ म्हणाला, “प्रत्येक खेळाडू वेगळा असतो, ते आपल्या बाद होण्याला कशाप्रकारे बघतात, सामना संपल्यानंतर ते याबद्दल काय विचार करतात हे वेगळे असते. हे महत्वाचे आहे की आपण पुढे गेले पाहिजे. खेळाडूंनी स्वतःला वैयक्तिकपणे बघायला हवे. बघावे की काय चांगले करू शकतो.”

स्टार गोलंदाज मोहम्मद शमीच्या मनगटाला फ्रॅक्चर होवून भारताला दुसरा धक्का बसला आहे. कारण भारतीय कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेवर गेल्यामुळे तो उर्वरीत तीन सामन्यात खेळणार नाही. स्मिथ म्हणाला, “भारताबद्दल अधिक विचार करत नाही, आणि याबद्दल ही नाही की ते वापसी करतील. आमच्यासाठी फक्त ही बाब आहे की, आम्हाला काय योग्य करण्याची गरज आहे.

इशांत शर्माची उणीव भासत असणार

स्मिथ म्हणाला की,” मोहम्मद शमीच्या गैरहजेरीत भारतीय संघाकडे नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज यांच्या रूपाने चांगले गोलंदाज आहेत. मला वाटते ते दोघे आंतराष्ट्रीय स्तरावरील चांगले गोलंदाज आहेत आणि ज्यांची कामगिरी चांगली ठरू शकते. निसंकोच भारताला इशांत शर्माची उणीव भासत असणार आहे,जो अनुभवाच्या दृष्टीने त्यांच्यासाठी मोठे नुकसान आहे.”

महत्वाच्या बातम्या:
– बिग ब्रेकिंग! क्रिकेटपटू सुरेश रैनाला मुंबई पोलिसांकडून अटक, गुन्हाही दाखल
– बॉक्सिंग डे कसोटी! पाहा काय आहे भारताचा आत्तापर्यंतचा इतिहास
बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियावर मात करायची आहे, तर असा सराव करा

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---