भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याची कसोटी खेळली जात आहे. दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया संघाला आपल्या स्फोटक फलंदाज डेविड वॉर्नरची कमतरता जाणवली. मात्र डेविड वॉर्नर सध्या दुखापतीमधून सावरत आहे. तो तिसऱ्या कसोटी सामन्यालाही मुकण्याची दाट शक्यता आहे.
या 34 वर्षीय डेविड वॉर्नरला भारता विरुद्धच्या वनडे मालिकेत दुसर्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तो उर्वरीत वनडे सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याचबरोबर भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेला सुद्धा मुकला होता. तसेच सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात देखील सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे या कसोटी मालिकेत त्याची उणीव भासत आहे.
पहिल्या कसोटी सामन्यातसुद्धा ऑस्ट्रेलिया संघ मोठी धावसंख्या अपयशी ठरला होता. त्याचबरोबर आता दुसर्या कसोटी सामन्यात सुद्धा ऑस्ट्रेलिया संघ भागीदारी करून मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाला नाही. त्यामुळे दुसर्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघ 195 धावावर सर्वबाद झाला. या डावात पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मोठी भागीदारी करता आली नाही.
तिसर्या कसोटीपूर्वी दुखापतीतून सावरेल
त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर चॅनेल 7 ला मुलाखत देताना रिकी पॉटिंगला म्हणाले, “डेविड वॉर्नरसारखा खेळाडू दुसरा कोणता खेळाडू नसेल, तो त्याला जे शक्य आहे ते सर्व करत आहे. त्याला अजून आशा आहे की तो तिसर्या कसोटीपूर्वी दुखापतीतून सावरेल. सामन्याअगोदर आम्ही त्याला फलंदाजीचा सराव करताना पाहिले आहे. त्याने एमसीजी मैदानावर सराव केला. तो सरावात फलंदाजी चांगली करत होता, मात्र त्याच्या मांडीमधे अजून समस्या आहे. आम्हाला माहित आहे त्याची उपस्थितीने संघाला किती फायदा होईल.”
आम्हाला खूप सुधारणा करावी लागेल जस्टीन लँगर :
डेविड वॉर्नरच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला आहे. त्याचबरोबर खेळाडूंमध्ये मोठी भागीदारी होताना दिसत नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर निराश आहेत. जस्टीन लँगर म्हणाले, “आम्हाला सामन्यात पकड निर्माण करता येत नाही. जर तुम्ही पहिला सामना आणि आताचा पहिला डाव बघितला, तर आम्ही भागीदारी करण्यात अपयशी ठरलो आहोत. या बाबतीत आम्हाला खूप सुधारणा करावी लागेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ खेळाडूला धावताना झाली होती दुखापत, आता झाला दोन आठवड्यांसाठी क्रिकेटपासून दूर
गावसकरांनी केली रहाणेची स्तुती; म्हणाले…
अजिंक्य रहाणेचे अभिनंदन करणे कोहलीला पडले महागात! ‘या’ कारणाने चाहत्यांनी केले ट्रोल