---Advertisement---

भारतीय गोलंदाजांना स्टिव्ह स्मिथचं चॅलेंज, “जर मला शॉर्ट चेंडू टाकण्याचा विचार करत असाल तर…”

---Advertisement---

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीनही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने खेळाच्या रणनीतीबद्दल भाष्य केलं आहे.

…तर त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला होईल

शॉर्ट चेंडूंबद्दल बोलताना स्मिथ म्हणाला की, “जर विरुद्ध संघ मला शॉर्ट चेंडू टाकण्याचा विचार करत असेल, तर त्याचा फायदा आमच्या संघाला होईल. मी जीवनात अशा प्रकारच्या कित्येक चेंडूंचा सामना केला आहे, त्यामुळे आता कोणत्याही प्रकारची भीती अथवा तणाव जाणवत नाही.”

वॅगनरने चमकदार गोलंदाजी केली होती- स्मिथ

न्यूझीलंडविरुद्धच्या मागील हंगामात डावखुरा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने शॉर्टपिच चेंडूवर स्मिथला चार वेळा बाद केले होते. स्मिथला वाटते की, वॅगनरने चमकदार गोलंदाजी केली होती पण इतरांना त्याची पुनरावृत्ती करता येणार नाही.

याबद्दल बोलताना स्मिथ म्हणाला की, “इतर काही विरोधी संघांनी प्रयत्न केले पण वॅगनरने जशी कामगिरी केली तसे ते करू शकले नाहीत. तो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे.”

बुमराह आणि शमी यांच्यावर असेल जबाबदारी
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर तीन वनडे सामने, तीन टी20 आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. भारतीय आक्रमक वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोन गोलंदाजांवर आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि नवदीप सैनी यांचीही कसोटी संघात निवड झाली आहे.

स्मिथने भारताविरुद्ध झळकावली 7 शतके

स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत भारताविरुद्ध 10 कसोटी सामने खेळले असून यामध्ये त्याने 1429 धावा केल्या आहेत. स्मिथने भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात 7 शतके आणि 3 अर्धशतके ठोकली आहेत. स्मिथची कामगिरी भारताविरुद्ध नेहमीच चांगली राहिली आहे. अशा परिस्थितीत या मालिकेतही स्मिथचे भारतीय गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असेल.

इशांत शर्मा तंदुरुस्त झाल्यावर करेल पुनरागमन
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 17 डिसेंबर रोजी ऍडिलेड येथे खेळला जाईल. यानंतर दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळला जाईल. भारताकडे मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहसारखे अनुभवी वेगवान गोलंदाज आहेत जे विरोधी संघातील फलंदाजांवर वरचढ ठरू शकतात. भारतीय अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याला पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावर कसोटी संघात स्थान मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलियातील भारतीय खेळाडूंच्या हॉटेलजवळील मैदानावर विमान कोसळले

राहुल द्रविडने सांगितले, मुंबई इंडियन्सच्या यशामागील ‘हे’ आहे खरे कारण

“लोकांना दुखापतीबद्दल काही माहित नसते, त्यामुळे ते मुर्खपणाची बडबड करतात” – सौरव गांगुली

ट्रेंडिंग लेख –

ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार

सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही

भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---