---Advertisement---

टिम पेन ऐवजी ‘या’ खेळाडूला कर्णधार करा, इयान हिली यांनी केली मागणी

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 4:16 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनला आपल्या नेतृत्व क्षमतेबद्दल मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागत आहे. मालिकेमध्ये अनेक वेळा टीम पेन बचावात्मक कर्णधारपद भूषवत असल्याची त्याचवर टीका केली जात आहे. अनेक ऑस्ट्रेलियन दिग्गजांना सिडनी येथील अनिर्णित झालेला सामना सहन झालेला नाही व त्यामुळे पेनवर टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज यष्टीरक्षक खेळाडू इयान हिली यांनी स्टीव स्मिथला पुन्हा कर्णधार बनवण्याची मागणी केली आहे.

एका चर्चेदरम्यान हिली म्हणाले, “माझ्यामते आणखी 12 ते 18 महिन्यात स्टीव स्मिथने ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद सांभाळावे, जर त्याची इच्छा असेल तर. कारण स्मिथने अगोदरच बरच काही सहन केलं आहे. मला वाटते की स्मिथने शानदार नेतृत्व करावे व आपल्या विरोधकांची तोंडे बंद करावीत. स्मिथने पुनरागमन करावे अशी माझी इच्छा आहे, कारण त्याने काही न करताच फार मोठी शिक्षा भोगली आहे.”

हिली यांनी जरी स्टीव स्मिथला कर्णधार म्हणून आपली पसंती दिली असली, तरी पॅट कमिन्सचे नाव देखील कर्णधार पदाच्या शर्यतीत अग्रेसर आहे. काही महिन्यांपूर्वीच कमिन्सला कसोटी संघाचे उपकर्णधारपद देण्यात आलेली आहे. हिली यांच्यामते जर कमिन्स कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवणार असेल, तर त्याला अनुभव येण्यासाठी अगोदर वनडे टीमचे कर्णधारपद देण्यात यावे.

महत्वाच्या बातम्या:

बॉर्डर-गावसकर चषकात भारताचे निर्विवाद वर्चस्व, तब्बल इतक्या वेळा जिंकली आहे मालिका

भारताच्या ऐतिहासिक विजयाचे एबी डिविलियर्सकडून खास कौतुक, म्हणाला

जो रूटने केला त्या जबरा इंग्लंड फॅनला फोन, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---