भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात उद्यापासून(2 मार्च) पाच सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडीयम, हैद्राबाद येथे होणार आहे.
मात्र या सामन्याआधी नेटमध्ये सरावादरम्यान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला दुखापत झाली आहे. त्याला सपोर्ट स्टाफमधील राघवेंद्रचे थ्रोडाउन घेताना उजव्या हाताच्या मनगटाजवळ ही दुखापत झाली आहे.
जर धोनी या दुखापतीमुळे पहिल्या वनडे सामन्यात खेळला नाही तर रिषभ पंत यष्टीरक्षणाची जबाबदारी स्विकारेल. त्याचबरोबर टी20 मालिकेत चांगली कामगिरी केलेल्या केएल राहुलला पहिल्या वनडेसाठी अंतिम 11 संधी मिळणार का हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–मुंबईकर रोहित शर्मासाठी उद्याचा वनडे सामना ठरणार खास
–एकाच दिवसात झाली तब्बल ६८ षटकारांची बरसात…
–टी२० क्रमवारीत विराट नाही तर हा एकमेव भारतीय फलंदाज आहे टॉप टेनमध्ये!