पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने दमदार गोलंदाजी केली. त्याने नुकतेच मेलबर्न येथे होणाऱ्या दुसर्या सामन्यात उसळी घेणारी खेळपट्टी असावी, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. हा सामना 26 डिसेंबरला खेळला जाईल.
उसळी असणारी खेळपट्टी हवी
माध्यमांशी पुढील सामन्यांबद्दल बोलताना पॅट कमिन्स म्हणाला, “मेलबर्न क्रिकेट मैदानावर अॅशेस कसोटी (2017-18)आणि दोन वर्षापूर्वी भारताविरुद्धचा सामना खूपच सपाट मैदानावर खेळला गेला होता. एक गोलंदाज म्हणून मागील वर्षी न्यूझीलंड विरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्याची खेळपट्टी खुप चांगली होती. त्यामधे चेंडू काटा बदलत होता, गती आणि उसळी घेत होता. त्यामुळे अपेक्षा आहे की यंदा ही तशीच खेळपट्टी असेल. कारण जेव्हा चेंडू आणि बॅट यामधे चांगला सामना होतो, तेव्हा एक खेळाडू आणि प्रेक्षक म्हणून तुम्हाला खेळपट्टी चांगली वाटते. आपल्याला वाटते की जर आपण आपल्या कौशल्याचा योग्य उपयोग करून घेतला तर सामन्यावर चांगली छाप उमटवू शकतो.”
पुजाराबाबत आमची योजना तयार
पॅट कमिन्सने पहिल्या सामन्यात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांची महत्त्वपूर्ण विकेट घेतली होती. भारताचा कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेवर मायदेशी जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या फलंदाजीची जबाबदारी पुजारावर असणार आहे. पुजाराच्या विकेटबद्दल बोलताना पॅट कमिनस म्हणाला, “खेळपट्टी कडून मदत मिळत होती, असे वाटत होते. चेंडू काटा बदलत आहेत. आम्ही त्याच्या (पुजारा) बचावात्मक टेक्निकला आव्हान देवू शकतो. खेळपट्टीवर चेंडू उसळी घेत असेल तर नक्कीच मदत मिळेल.”
ऑस्ट्रेलिया संघाच्या उपकर्णधाराने फिरकीपटू नॅथन लियॉनचे सुद्धा कौतुक केले, कारण त्याने पहिल्या डावात पुजाराला चांगली गोलंदाजी केली होती. तो म्हणाला, “मला वाटते लियॉनने पहिल्या डावात त्याच्याविरुद्ध् चांगली गोलंदाजी केली. आम्हाला त्याच्याविरुद्ध काय योजना आखायची याच्यामुळे स्पष्ट झाले.” तो म्हणाला, “आम्ही पाहिले की डाव्या बाजूला अतिरिक्त खेळाडू उभा करून त्याच्या यष्टिला लक्ष करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याने पहिल्या डावात खुप चांगली फलंदाजी केली. आम्ही सुद्धा चांगली गोलंदाजी करून धावफलक हलता ठेवू दिला नाही. जर तो मोठी खेळी करू शकला नसता तर सामन्यावर आमची पकड निर्माण झाली असती.”
संबधित बातम्या:
– दुखापतग्रस्त शमीच्या जागी कोणाला संधी मिळणार? हा खेळाडू करू शकतो पदार्पण
– IND vs AUS : ऑस्ट्रेलियन दिग्गजाची चेतेश्वर पुजाराविषयी वादग्रस्त कमेंट, चाहत्यांनी केले ट्रोल
– ग्रीनने घेतला विराटचा एव्हरग्रीन झेल आणि कमिन्सने पार केला विकेटचा मोठ्ठा टप्पा; पाहा व्हिडिओ