---Advertisement---

निर्णायक सामन्यात भारतीय संघास ‘या’ खेळाडूंपासून राहवं लागेल सावध, अन्यथा पुन्हा पदरी निराशाच!

On: सोमवार, जून 24, 2024 4:46 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024  मध्ये भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. टीम इंडियाने आतापर्यंत स्पर्धेत पाच सामने खेळली आहे. ज्यामध्ये सागळ्या सामन्यात विजय मिळवली आहे. साखळी फेरीत भारत विरुद्ध कॅनडा सामना पावसामुळे रद्द करण्यात आले होते. आता सुपर-8 मध्ये आज (24 जून) भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे अव्हान असणार आहे. टी20 विश्वचषकात 8 वर्षांनी या दोन्ही संघात सामना रंगणार आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांसाठी महत्तवाचा आहे. पण या सामन्यात भारतासाठी ऑस्ट्रेलियाचे हे तीन खेळाडू डोकेदुखी ठरु शकतात.

भारतासाठी ट्रेव्हिस हेड, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, आणि ॲडम झाम्पा हे ऑस्ट्रेलियाई तीन खेळाडू रोहित शर्माचे डोकेदुखी ठरु शकतात. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ट्रेव्हिस हेडने भारतीययांचे विश्वचषकाचे  स्वप्न तोडले होते. हे पाचही खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी मॅच विनिंग खेळाडू आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडूंसमोर अव्हान असणार आहे.

ट्रेव्हिस हेड– ट्रेव्हिस हेडची भारतीय संघाविरुद्ध शानदार आकडेवारी आहे. आणि यंदाच्या विश्वचशकात काही सामने सोडले तर ट्रेव्हिस हेडने शानदार कामगिरी केली आहे. त्याने स्पर्धेत 151 च्या स्ट्रइक रेटने आता पर्यंत 179 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियासाठी यंदाच्य विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

मार्कस स्टोइनिस– आयसीसी टी20 अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला मार्कस स्टोइनिस भारतीय संघासाठी घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्पर्धेत स्टोइनिसने साखळी सामन्यात दोनदा सामनावीरचा पुरस्कार जिंकला आहे. स्पर्धेत आतापर्यंत त्याने 169 च्या स्ट्राइक रेटने 167 धावा केल्या आहेत तर गोलंदाजीत देखील त्याने 8 विकेट्स घेतल्या आहेत. फसलेला सामना काढण्याची कुवत त्यांच्या मध्ये असल्याने भारतीय संघास त्याला लवकरच तंबूत पाठवावे लागेल.

ग्लेन मॅक्सवेल– यंदाच्या टी20 विश्वचषकात ग्लेन मॅक्सवेल फारसा लयीत नसला तरी मागील दोन सामन्यात मॅक्सवेलच्या बॅट मधून धावा निघाल्या आहेत. शेवटच्या सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले होते.  भारतीय संघासमोर त्याची उल्लेखनीय कामगिरी नसली तरी तो पार्टटाइम गोलंदाजी करु शकतो. एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनल मध्ये त्याने रोहित शर्माचे महत्वपूर्ण विकेट मिळवले होते.

पॅट कमिन्स– मागील दोन सामन्यात सलग हॅटट्रिक घेऊन विक्रम केलेल्या पॅट कमिन्स भारतीय संघासाठी मोठी डोकेदुखी ठरु शकतो. या विश्वचशकात प्रत्येक सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नसली तरी जेव्हा संघात स्थान मिळाले आहे तेव्हा त्यांने आपली कला दाखवून दिली आहे. रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स यांची हेड टू हेड पहायला मिळणार आहे.

ॲडम झाम्पा– टी20 विश्वचषक 2024 मध्ये ॲडम झाम्पा सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 6 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय फलंदाजांना या चतुर फिरकीपटु समोर सावध फलंदाजी करावे लागेल.

महत्तवाच्या बातम्या-

 स्मृती मंधाना सारखं कोणीच नाही! महिला क्रिकेटमध्ये रचला आणखी एक इतिहास
आंद्रे रसलची एक चूक अन् वेस्ट इंडिज विश्वचषकातून बाहेर!
दुर्दैवी! इरफान पठाणच्या जवळच्या व्यक्तीचा वेस्ट इंडिजमध्ये मृत्यू, स्विमिंग पूलमध्ये आढळला मृतदेह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---