कोरोना या साथीच्या आजाराच्या निर्बंधांमुळे भारतीय संघाने मागील 7 महिन्यांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. आता दीर्घ कालावधीनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तिन्ही क्रिकेट प्रकारच्या मालिका खेळण्यासाठी गेला आहे. या दौऱ्याला वनडे मालिकेने 27 नोव्हेंबर 2020 रोजी सुरुवात होईल. या दौऱ्यातील मालिकांना सुरुवात होण्याआधी ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने एक भविष्यवाणी केली आहे.
सोनी या प्रसारण वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ग्लेन मॅकग्रा याने पत्रकारांशी चर्चा केली. ऑस्ट्रेलियाच्या या माजी वेगवान गोलंदाजाने सांगितले की, सन 2018-19 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली होती. मात्र यावेळी दोन्ही संघांचे गोलंदाजी आक्रमण महत्त्वाचे ठरणार आहे.
मॅकग्रा म्हणाला की, “उमेश यादवच्या गोलंदाजीत गती आहे. मोहम्मद शमीचा त्याच्या चेंडूंवर चांगलाच ताबा आहे आणि तो दोन्ही बाजूंनी चेंडू फिरवतो. जसप्रीत बुमराह हा आक्रमक गोलंदाज आहे. त्याची खेळाविषयीची मानसिकता अद्भुत आहे. दुसरा आणि तिसरा स्पेल फेकतानासुद्धा त्याच्या गोलंदाजीचा वेग कमी होत नाही. या गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी केली, तर त्यांचा पराभव करणे अवघड आहे.”
यानंतर मॅकग्रा ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांची प्रशंसा करताना म्हणाला की, “ऑस्ट्रेलियाकडे जोश हेझलवुडसारखा वेगवान गोलंदाज आहे, जो उत्तम लाईन आणि लेंथवर चेंडू फेकू शकतो. तो उंच आहे आणि तंदुरुस्त आहे.”
“हेजलवुडनंतर ऑस्ट्रेलियाकडे पॅट कमिन्स हा जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याच्याकडे अधिक काळ गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. तो नेहमी 100 टक्के देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या धावण्याच्या शैलीमुळे तो नेहमीच एका विशिष्ट अँगलने गोलंदाजी करतो. यानंतर या संघाकडे डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आहे. जेव्हा तो उत्तम लयमध्ये असतो, तेव्हा 4-5 बळी सहज घेतो. त्याच्यामध्ये तो एक्स फॅक्टर आहे.”असेही पुढे बोलताना मॅकग्रा म्हणाला
“जर दोन्ही संघ आपल्या पूर्ण सामर्थ्याने गोलंदाजी करीत असतील, तर मी या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला पुढे ठेवू इच्छित आहे, कारण ऑस्ट्रेलियाकडे मिशेल स्टार्क आहे जो खूप प्रभावी ठरेल.”
विराटच्या अनुपस्थितीबद्दल बोलताना मॅकग्रा म्हणाला की, “यावेळी विराट कोहली देखील प्रथम कसोटीनंतर संघात राहणार नाही, यामुळे चेतेश्वर पुजारावर दबाव वाढेल.”
मागील वेळी (2018-19) पुजाराच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली होती. त्याने येथे 3 शतकांच्या मदतीने 571 धावा केल्या होत्या. विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची फलंदाजीची जबाबदारी पुजारावर असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलपुढे पाकिस्तान सुपर लीगमधील बक्षिसाची रक्कम म्हणजे… अतिसामान्य !!
कराची किंग्स पाकिस्तान सुपर लीगचा विजेता; आयपीएल पाठोपाठ ‘या’ खेळाडूला ७ दिवसात दुसरे विजेतेपद
आयपीएलमध्ये अपयश आलेला विराट लागला कसोटीच्या तयारीला, पाहा कसा सुरु केलाय सराव
ट्रेंडिंग लेख –
अन् बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी क्रिकेट स्टेडियममध्ये साप सोडण्याचा केला होता प्लॅन
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला