ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेत दोन सामने पार पडले आहे. दोन्ही संघाने सध्या मालिकेत बरोबरी केली आहे. त्यामुळे आता सर्वाचे लक्ष तिसर्या कसोटी सामन्यावर आहे. मात्र या सामन्यापूर्वी वसीम जाफर यांनी अजिंक्य रहाणेला सोशल मीडियावरून एक सिक्रेट संदेश पाठवला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी पासून सिडनीत खेळला जाणार आहे. हा सामना सिडनीत खेळला जाईल. त्यापूर्वी वसीम जाफर यांनी अजिंक्य रहाणेला सोशल मीडियाच्या माध्यामातून एक सिक्रेट संदेश पाठवला आहे. जो चाहत्यांना समजून घेण्यात गोंधळ निर्माण होत आहे. वसीम जाफर यांनी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्ती स्विकारली आहे.
Today I had nice filter coffee by the lake. Amazing how fish can breathe underwater. Then I walked past a potrait of Che Guevara before bumping into an old pal from Dombivali who now has a restaurant in Borivali.
Btw good luck for SCG test @ajinkyarahane88 #Decode 😉 #AUSvIND
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) January 4, 2021
ते सध्या आयपीएल स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रशिक्षक आहेत. मागील वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेनंतर वसीम जाफर सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट आणि मीम्सने चर्चेत आले आहेत. जाफर यांनी मेलबर्न येथे खेळला गेलेल्या दुसर्या कसोटी सामन्यापूर्वी प्लेईंग इलेव्हन निवडण्या संबधित अजिंक्य रहाणेला एक सिक्रेट संदेश पाठवला होता. वसीम जाफर यांनी पुन्हा एकदा आता तिसर्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्रजीत सोशल मीडियावरून संदेश पाठवला आहे.
Rahul
Gill
Pujara
Rohit
Rahane— cricket wala ladka (@cricketwalaldka) January 4, 2021
वसीम जाफर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा संदेश शेअर केला आहे. यामध्ये लिहिले आहे, “आज मी नदी किनारी चांगली फिल्टर कॉफी प्यायलो. हे शानदार आहे की मासा पाण्यात श्वास घेवू शकतो. मी डोंबिवलीमध्ये चे ग्वेराच्या पोर्ट्रेट जवळून कोणत्यातरी जुन्या साथीदारांसोबत धडकण्या अगोदर गेलो. ज्याच्याजवळ बोरिवलीमध्ये एक रेस्टॉरंट आहे. सिडनी कसोटीसाठी शुभेच्छा.”
The top 5 – Mayank (lake as in Blore ) gill (fish ) Guevara ( Pujara)Rahane (Dombivali) Rohit ( Borivali)
— Nambo (@nitin_nam) January 4, 2021
वसीम जाफर यांच्या सिक्रेट संदेशामुळे चाहत्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. नदीच्या किनारी फिल्टर कॉफी याबद्दल लोक वेग-वेगळे तर्क लावत आहेत. काही लोक केएल राहुल सोबत जोडत आहेत. तर काही लोक अश्विन सोबत जोडत आहेत. तसेच काही लोक मयंक अगरवाल सोबत ही जोडत असताना दिसत आहेत.
https://twitter.com/strugglerr1/status/1345973494673076224?s=19
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या या मालिकेतील पहिले दोन सामने संपन्न झाले आहेत. या मालिकेतील पहिला सामना एॅडलेड येथे खेळला होता. हा सामना गुलाबी चेंडूने खेळला होता आणि त्याचबरोबर दिवस रात्र खेळण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने संघाने विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर दुसरा सामना मेलबर्न येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करताना ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने मिळवला होता. त्यामुळे मालिकेत बरोबरी झाली होती. आता तिसरा कसोटी सामना सिडनीत 7 जानेवारी पासून खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटीत शुन्यावर बाद होणं महापाप! ‘या’ तीन आशियायी फलंदाजांनी तर सलग तीन डावात केलंय हे काम
निकाल तर शंभर टक्के लागणार, परंतू पाहा काय आहे श्रीलंका-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याची सद्यस्थिती
चालू कसोटी सामन्याच्या शेजारी चिमुकल्यांनी मांडला क्रिकेटचा डाव, फोटो सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ