---Advertisement---

World Cup 2023 Final पूर्वी रोहितबद्दल नेहराचे लक्षवेधी भाष्य; म्हणाला, ‘तो फक्त विराटमुळेच…’

Ashish-Nehra
---Advertisement---

विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची बॅट चांगलीच तळपत आहे. रोहित एक आक्रमक फलंदाज असून तो त्याच्या मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, पण विश्वचषकात त्याचे वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. रोहित स्पर्धेतही आक्रमक खेळ दाखवत आहे. तो आपल्या संघाला विश्वचषक जिंकून देण्यासाठी जीवाचे रान करताना दिसत आहे. तो ज्याप्रकारे खेळत आहे, त्यामुळे इतर खेळाडूंना फायदा होत आहे.

विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 10 सामने खेळले आहेत. यादरम्यान कमीत कमी चेंडू खेळून जास्तीत जास्त धावा करण्याचा, त्याचा प्रयत्न राहिला आहे. जेणेकरून संघाला चांगली सुरुवात मिळेल. रोहित अशाप्रकारे का खेळत आहे आणि तो इतका निर्भीड आणि आक्रमक पद्धतीने अंतिम सामन्यातही का खेळू शकतो? याविषयी भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा (Ashish Nehra) याने स्पष्टीकरण दिले आहे.

विराटमुळे रोहित निर्भीड
आशिष नेहराने आघाडीच्या क्रिकेट वेबसाईटशी बोलताना म्हटले की, “भारतीय कर्णधार रोहित शर्मा इतका निर्भीड आणि आक्रमक पद्धतीने का खेळू शकतो? कारण विराट कोहली (Virat Kohli) त्याच्यामागे आहे. विराट आपल्या वेळेसोबत खेळतो, कारण रोहित आपल्या अंदाजात फलंदाजी करतो आणि ते दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात, जे या विश्वचषकात पूर्णपणे एकमेकांना पूरक दिसत आहेत. यातून संघाला फायदा मिळत आहे.”

खरं तर, विराटने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यात 711 धावा केल्या आहेत. तसेच, रोहितने 10 सामन्यात 550 धावा केल्या आहेत. दोघांनी मिळून स्पर्धेत 1261 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, संघाविषयी बोलायचं झालं, तर भारतीय संघाने या स्पर्धेत खेळलेल्या दहाच्या दहा सामन्यात विजय मिळवला आहे. आता भारत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. हा सामना रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. (india vs australia wc 2023 final why rohit sharma can play fearless cricket in wc says former indian cricketer ashish nehra)

हेही वाचा-
World Cup 2023: Player of the Tournament साठीचे सर्वात मोठे 9 दावेदार, विराटला सहकाऱ्यांकडून टक्कर
ICC world cup: सिकंदर बख्तच्या टॉस फिक्सिंगच्या आरोपाला वसीम अक्रमचं चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘हे सर्व ऐकून मला…’

Ahmedabad Final INDvAUS Ashish Nehra Ashish Nehra News Ashish Nehra Reaction Ashish Nehra Rohit Sharma Ashish Nehra statement Ashish Nehra Virat Kohli Final free live match ICC World Cup ICC World Cup 2023 ICC world cup Australia vs India ICC world cup final ICC world cup india vs Australia ICC world cup Modi ICC world cup Team India India vs Australia final Indian Cricket Team live match MAN OF THE MATCH Man of the Series Modi Stadium Mohammed Shami Narendra Modi Stadium Richard Kettleborough Richard Kettleborough Umpire Richard Kettleborough Umpire in India Vs Australia Final rohit sharma Umpire Richard Kettleborough virat kohli Warner who will win World Cup Final world cup final live अहमदाबाद अहमदाबाद भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना आयसीसी वर्ल्डकप आयसीसी विश्वचषक आशिष नेहरा आशिष नेहरा बातम्या आशिष नेहरा रोहित शर्मा आशिष नेहरा विराट कोहली आशिष नेहराची प्रतिक्रिया आशिष नेहराचे विधान इंडिया विरुद्ध ॲास्ट्रेलिया किती रन झालेत? कोण जिंकणार गुजरात टीम इंडिया टीम ॲास्ट्रेलिया नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात पंच रिचर्ड केटलबोरो फायनल फायनल लाईव्ह भारत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया भारत विरुद्ध ॲास्ट्रेलिया भारतीय क्रिकेट संघ मॅच विनर मॅन ॲाफ द मॅच मोहम्मद शमी रिचर्ड केटलबोरो रिचर्ड केटलबोरो पंच रिचर्ड केटलबोरो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पंच रोहित शर्मा वर्ल्डकप फायनल विराट कोहली विश्वचषक फायनल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---