---Advertisement---

दुसऱ्या टी२० सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

On: गुरूवार, नोव्हेंबर 7, 2019 6:41 PM
---Advertisement---

राजकोट।  आज(7 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात दुसरा टी20 सामना(2nd T20I) सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट(Saurashtra Cricket Association Stadium, Rajkot) येथे पार पडणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी 11 जणांच्या भारतीय तसेच बांगलादेश संघात एकही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे दिल्लीमध्ये पहिल्या टी20 सामन्यात खेळलेले भारत-बांगलादेशचे 11 जणांचा संघच आजच्या सामन्यातही खेळताना दिसणार आहे.

दिल्लीत झालेला पहिला टी20 सामना बांगलादेशने जिंकून 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तर भारतीय संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या उद्देशाने आज मैदानात उतरेल.

असे आहेत 11 जणांचे संघ –

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, खलील अहमद.

बांगलादेश – लिटन दास, सौम्य सरकार, मोहम्मद नाईम, मुश्फिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमूदुल्लाह (कर्णधार), आफिफ हुसेन, मोसाद्दक हुसेन, अमीनुल इस्लाम, शफीउल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, अल-अमीन हुसेन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---