रविवारी (10 नोव्हेंबर) नागपूर (Nagpur) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संंघात तिसरा आणि निर्णायक टी20 सामना पार पडणार आहे. भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नवीन नवीन विक्रम करत आहे. त्याला आज होणाऱ्या सामन्यातही खास पराक्रम करण्याची संधी आहे.
या सामन्यात रोहितला आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 400 षटकार पूर्ण करण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला केवळ 2 षटकारांची गरज आहे. हा पराक्रम त्याने केला तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकार मारणारा पहिलाच भारतीय तर जगातील केवळ तिसरा क्रिकेटपटू ठरेल.
याआधी केवळ ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदीने ही कामगिरी केली आहे. गेलने 462 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 534 षटकार ठोकले आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार पूर्ण करणारा गेल सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे.
त्याच्यापाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत आफ्रिदी आहे. त्याने 524 सामन्यात 476 षटकार ठोकले आहेत.
भारताकडून खेळताना रोहितने आतापर्यंत एकूण 398 षटकार मारले आहेत. रोहितने कसोटी सामन्यात एकूण 51 षटकार मारले आहेत. तर, वनडेत 232 षटकार मारले आहेत. 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात रोहितने सर्वाधिक 115 षटकार मारले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने मारलेले षटकार
51 षटकार – कसोटी, सामने 30
232 षटकार – वनडे, सामने 218
115 षटकार – टी20, सामने 100
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
535 षटकार – ख्रिस गेल (Chris Gayle)
476 षटकार – शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi)
398 षटकार – रोहित शर्मा (Rohit Sharma)
398 षटकार – ब्रेंडन मॅक्यूलम (Brendon McCullum)
359 षटकार – एमएस धोनी (MS Dhoni)
यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतबद्दल बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले…
वाचा 👉 https://t.co/7RfUWr4R4H 👈 #म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 10, 2019
बंदीमुळे टीम इंडियाकडून खेळत नसलेला पृथ्वी शाॅ खेळणार या संघाकडून
वाचा- 👉https://t.co/e002uAMU07👈#म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 10, 2019