रविवारपासून (3 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांग्लादेशमध्ये 3 टी20 सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होत आहे. यामध्ये टी20 मालिकेसाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. त्यामुळे रोहित शर्मा टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
याच टी20 मालिकेत भारतीय संघात यष्टीरक्षक- फलंदाज संजू सॅमसनचे तब्बल 4 वर्षांनंतर पुनरागमन होत आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये केरळसाठी खेळताना फलंदाज संजू सॅमसनने द्विशतक ठोकले होते. सॅमसनसोबत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतही भारतीय संघाचा भाग आहे.
2015मध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली संजू सॅमसनने एकमेव आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला होता.
भारतीय संघातील अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. त्यामुळे त्याच्या बदल्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दूूबेला संघात स्थान देण्यात आले.
बांगलादेश विरुद्ध टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर.