अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या सुरु असलेल्या टी२० मालिकेतील पहिला सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताला ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. तसेच या सामन्यादरम्यान भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या प्रेक्षकांवर वैतागलेला दिसला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
झाले असे की भारताने इंग्लंडला विजयासाठी १२५ धावाचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडकडून जॉस बटलर आणि जेसन रॉय सलामीला फलंदाजीसाठी उतरले. यावेळी ५ व्या षटकात भारताकडून अक्षर पटेल गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या या षटकातील ५ व्या चेंडूवर बटलरने मिडविकेटच्या वरून एक शानदार षटकार ठोकला होता.
या षटकाराचा चेंडू थेड स्टेडियममधील स्टँडमध्ये गेला. तिथून प्रेक्षकांनी तो चेंडू मैदानात फेकण्यास बराच वेळ लावला. यावेळी हार्दिक प्रेक्षकांनी चेंडू मैदानात टाकण्याची वाट पाहात होता. तसेन तो नंतर वैतागून चेंडू मागतानाही दिसला. अखेर प्रेक्षकांनी चेंडू मैदानात फेकल्यानंतर चेंडू सॅनिटाईज करण्यात आला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/pant_fc/status/1370404067277635588
इंग्लंडचा भारतावर विजय
पहिल्या टी२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १२४ धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने २१ धावा केल्या. अन्य फलंदाजांना फार काही करता आले नाही. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
तसेच त्यानंतर १२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी ७२ धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. बटलर २८ धावा करुन बाद झाल्यानंतरही रॉयने डेविड मलानसह डाव पुढे नेला. पण रॉय ४९ धावा करुन बाद झाला.
त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि मलानने आणखी विकेट न गमावता इंग्लंडचा डाव पुढे नेला. नंतर १६ व्या षटकात मलानने षटकार ठोकत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मलानने नाबाद २४ धावा केल्या. तर बेअरस्टोने नाबाद २६ धावा केल्या. भारताकडून युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी १ विकेट घेतली.
इंग्लंडने या विजयासह ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता पुढील सामना १४ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Video : क्रिकेटच्या मैदानात पुन्हा युवराजचे वादळ; सलग चार षटकार ठोकत केले चाहत्यांचे मनोरंजन
कुछ नही बदला यार! सचिनच्या ‘त्या’ स्ट्रेट ड्राईव्हने चाहते हरवले आठवणीत, पाहा व्हिडिओ